काय असते फ्लॅट व्हॉईट कॉफी?

न्यूयॉर्क : गुगलने सोमवारी ‘फ्लॅट व्हाईट कॉफी डे’चे औचित्य साधत फ्लॅट व्हॉईट कॉफीचे गुगल डुडल झळकावले आणि यानंतर फ्लॅट व्हॉईट कॉफी नेमकी असते तरी कशी, याची साहजिकच चर्चा सुरू झाली. तसे कॉफीचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. फिल्टर कॉफी, ब्लॅक कॉफीबरोबरच कॅपेचिनो, लॅट्टे देखील अनेकांच्या पसंतीचे असतात. कॅपेचिनो व लॅट्टे यांच्यातील महत्त्वाचा फरक असा आहे की, … The post काय असते फ्लॅट व्हॉईट कॉफी? appeared first on पुढारी.

काय असते फ्लॅट व्हॉईट कॉफी?

न्यूयॉर्क : गुगलने सोमवारी ‘फ्लॅट व्हाईट कॉफी डे’चे औचित्य साधत फ्लॅट व्हॉईट कॉफीचे गुगल डुडल झळकावले आणि यानंतर फ्लॅट व्हॉईट कॉफी नेमकी असते तरी कशी, याची साहजिकच चर्चा सुरू झाली. तसे कॉफीचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. फिल्टर कॉफी, ब्लॅक कॉफीबरोबरच कॅपेचिनो, लॅट्टे देखील अनेकांच्या पसंतीचे असतात. कॅपेचिनो व लॅट्टे यांच्यातील महत्त्वाचा फरक असा आहे की, कॅपेचिनोमध्ये फेसाचा जाड थर असतो आणि कोको पावडर किंवा दालचिनी पावडर ड्रिंकच्या वरून सर्व्ह केली जाते. यातही फ्लॅट व्हॉईट कॉफीचे वेगळेपण लक्ष वेधून घेणारे आहे.
फ्लॅट व्हॉईट कॉफीवट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही देशात बरेच वाद आहेत. फ्लॅट व्हॉईट कॉफी ही मूळ आपल्याच देशातील आहे, असा या दोन्ही देशांचा दावा आहे. यापूर्वी, 2011 मध्ये 11 मार्च रोजी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत फ्लॅट व्हॉईट कॉफी शब्दाचा समावेश करण्यात आला. त्यावेळेपासून 11 मार्च हा दिवस ‘फ्लॅट व्हॉईट कॉफी डे’ म्हणून साजरा केला जातो.
काही कॉफीमध्ये कॉफी पावडरचे प्रमाण जास्त असल्याने अशा प्रकारच्या कॉफी बर्‍याच कडवट चवीच्या असतात. फ्लॅट व्हॉईट कॉफीचा यात प्राधान्याने समावेश आहे. मायक्रोफोम, कॅपेचिनो आणि दूध यांचा हलका थर या कॉफीवर असतो. या कॉफीला मायक्रोफोममुळे दाटपणा येतो. अशा प्रकारची कॉफी नेहमी सिरॅमिक कपमध्ये सर्व्ह केली जाते आणि यामुळे आणखी बहार येते, असे कॉफीप्रेमींचे मत असते.
Latest Marathi News काय असते फ्लॅट व्हॉईट कॉफी? Brought to You By : Bharat Live News Media.