भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात

नंदुरबार; Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारी (12 मार्च) नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत असून, शहरातील सीबी मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी गांधी यांच्यासाठी आदिवासींच्या वतीने विशेष पारंपरिक होळी आयोजित केली आहे. यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. गांधी परिवारातील सदस्य 14 वर्षांनंतर नंदुरबारमध्ये दाखल होत असल्याने खास नवसाची होळी पेटवली जाणार आहे. देशात चांगला आणि पारदर्शक कारभार राहावा, शांतता नांदावी, यासाठी ही होळी पेटवली जाणार आहे. यासाठी खास कलापथक आणण्यात आले आहे.
हेही वाचा :
अहमदाबाद-मुंबईसह १० वंदे भारत रेल्वेंना पीएम मोदींना दाखवला हिरवा झेंडा
दोन्ही पवारांची ‘राजकीय मर्यादा’ पहिल्यांदाच अधोरेखित!
सीमा हैदरने ‘सीएए’ लागू होताच जल्लोष करत वाटले रसगुल्ले
Latest Marathi News भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात Brought to You By : Bharat Live News Media.
