आजचे राशिभविष्य मंगळवार, १२ मार्च २०२४

: चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. (Horoscope) मेष : श्रीगणेश सांगतात की, आज अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळाल्‍याने काही काळ सुरू असलेला मनातील संघर्ष … The post आजचे राशिभविष्य मंगळवार, १२ मार्च २०२४ appeared first on पुढारी.

आजचे राशिभविष्य मंगळवार, १२ मार्च २०२४

चिराग दारूवाला

: चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. (Horoscope)
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळाल्‍याने काही काळ सुरू असलेला मनातील संघर्ष संपुष्टात येईल. मात्र प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा. कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक कामात काळजी घ्यावी लागेल. पैशाशी संबंधित नुकसान होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्‍याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज काहीवेळ मनोरंजनात व्‍यतित कराल. यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा मिळेल. आर्थिकदृष्ट्या अडचणी येतील;पण त्‍यावर उपायही मिळतील. खर्चावरही नियंत्रण ठेवा. युवकांनी आळस सोडून आपले ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहावे. व्यवसायात उत्पादन क्षमता वाढेल. वरिष्ठांशी वाद घालू नका. (Horoscope)
मिथुन : आज कामात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थकबाकी मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. मित्राशी सल्लामसलत करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या कामात व्यस्त रहा आणि निरुपयोगी कामांमध्ये रस घेऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कुटुंबातील वरिष्ठांचा अनुभव आणि पाठिंबा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. व्यावसायिक कामाला गती देण्यासाठी अतिशय गांभीर्याने विचार करा आणि मूल्यमापन करा, जनसंपर्काची व्याप्ती आणखी वाढवल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : मागील काही काळापासून सुरु असलेले कौटुंबिक वाद मिटल्यामुळे घरात शांततेचे वातावरण राहील, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. लवकर कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. संयमाने काम करा, अतिउत्साहाने केलेले कामही बिघडू शकते. व्यवसायात मार्केटिंगकडे लक्ष द्या.
सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांचे संक्रमण तुमच्या कामाची क्षमतावाढवत आहे. निकटवर्तींशी भेट झाल्‍याने मन प्रसन्न राहील. प्रवास सकारात्‍मक राहिल. अहंकार टाळा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात व्यवस्था राखण्यात तुमचा वेळ जाईल. भविष्‍यात त्याचे सकारात्मक परिणामही मिळतील. आता कोणतेही नवीन काम सुरू करू नका. तुमच्या कामात जोडीदाराचा सल्ला घ्या.
कन्या : संतुलित वागणुकीमुळे आज परिस्थिती कशी असली तरी योग्य सामंजस्य राहील. तुमच्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतील. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कामांना प्राधान्‍य द्‍या. एखाद्याची चूक समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची चिंता राहील. व्यावसायिक क्रियाकलापांचे गांभीर्याने मूल्यांकन करा. (Horoscope)
तूळ : आज नवीन प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये तुमची आवड वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. प्रगतीच्‍या नवीन संधी उपलब्‍ध होतील. मुलाकडून चांगली बातमी मिळाल्‍याने आनंद होईल. आळशीपणा सोडा, तुमच्या कामावर अधिक लक्ष द्या. योग आणि ध्‍यान केल्‍याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाच्या ठिकाणी आपले सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी चांगले संबंध ठेवा. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
वृश्चिक : आज ग्रहांची स्थिती सकारात्मक राहिल. महिलांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. तुमच्या स्वभावात परिपक्वता आणा. कारण किरकोळ घटनांवरुन तुमची चिडचिड घरातील वातावरण दूषित करू शकते. अनावश्यक वाढत्या खर्चामुळे तुमच्या शांततेवर आणि झोपेवरही परिणाम होईल. जवळच्या व्यावसायिकांशी चालू असलेल्या स्पर्धेत यश मिळेल, असे श्रीगणेश म्‍हणतात.
धनु : तुमच्या योग्य कार्यशैलीचे आज समाजात कौतूक होईल. कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम दिसतील. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. गैरसमजामुळे जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे देखील आवश्यक. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. बेकायदेशीर कामे टाळा, असे श्रीगणेश सांगतात.
मकर : आज कुटुंबात सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही केलेल्या नियमांमुळे घरातील शिस्त कायम राहिल, असे श्रीगणेश सांगतात. सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा ताण जास्त असेल. आपल्‍या कार्यालयीन कामावर लक्ष केंद्रीत कारवे.
कुंभ : आज काही काळापासून रखडलेली कामे सहज मार्गी लागतील, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्‍याही कामात घाई टाळा. शांततेने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा. खास व्यक्तींसोबतची भेट फायदेशीर ठरेल. अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. घरातील वरिष्ठांचा सल्ला पाळणे चांगले. नवीन व्यावसायिक करार लाभादायक असतील. कर्ज घेताना पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक ठरेल.
मीन : श्रीगणेश म्हणतात की, आज आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. परदेशात जाणाऱ्या मुलांबाबतही कारवाई सुरू केली जाईल. वादापासून स्वतःला दूर ठेवा.विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. पण काळजी करू नका, तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही. व्यवसायाच्या रखडलेल्या कामात गती येईल. (Horoscope)
हेही वाचा : 

WTC Final : दहापैकी पाच कसोटी जिंकल्यास भारत गाठणार टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल
यंत्रमाग वीज बिल सवलत योजनेच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Jalgaon News | शेताच्या बांधावर बैलगाडी पलटी झाल्याने १३ वर्षीय मुलगा जागीच ठार ! कठड्याला लावलेला विळा घुसला कपाळात

Latest Marathi News आजचे राशिभविष्य मंगळवार, १२ मार्च २०२४ Brought to You By : Bharat Live News Media.