पाणी काटकसरीने वापरा; दर रोटेशननंतर बैठक : पालकमंत्री मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सोमवारी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. दर रोटेशननंतर बैठक घ्यावी आणि त्यानंतरच उपसाबंदीचा निर्णय घ्यावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी प्रकल्पनिहाय वापर झालेला आणि शिल्लक पाणीसाठा याचा आढावा घेण्यात आला. (Hasan Mushrif) यावेळी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, … The post पाणी काटकसरीने वापरा; दर रोटेशननंतर बैठक : पालकमंत्री मुश्रीफ appeared first on पुढारी.

पाणी काटकसरीने वापरा; दर रोटेशननंतर बैठक : पालकमंत्री मुश्रीफ

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सोमवारी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. दर रोटेशननंतर बैठक घ्यावी आणि त्यानंतरच उपसाबंदीचा निर्णय घ्यावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी प्रकल्पनिहाय वापर झालेला आणि शिल्लक पाणीसाठा याचा आढावा घेण्यात आला. (Hasan Mushrif)
यावेळी जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर यांच्यासह बाळासाहेब खाडे आदींनी तत्काळ उपसाबंदीचा निर्णय घेऊ नका, अशी मागणी करत मे महिन्यात उपसाबंदी लागू करणार का, अशी विचारणा केली. यावर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी ही उपसाबंदी पाणी वापरावर मर्यादा यावी म्हणून नाही, तर धरणातील पाणी अखेरच्या गावातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले. गतवर्षी उपसाबंदीने सुमारे 500 कोटी रुपयांच्या ऊस उत्पादनाचे नुकसान झाल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. यामुळे किमान नदीत उपसा बंदी लागू करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
सद्य:स्थितीत उपसाबंदी न करता, पाण्याचा अपव्यय न करता अत्यंत काटकसरीने करण्याचा सल्ला पालकमंत्री तथा समिती अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिला. पाणी साठ्याचा अभ्यास करून रोटेशननुसार तीन आठवड्यांनी ही बैठक घेऊन उपसाबंदीबाबत पडताळणी करावी, असाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, माजी आमदार संजय घाटगे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, शिल्पा मगदूम-राजे, रोहित बांदिवडेकर, डी. डी. शिंदे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कर्नाटकला आता 3.11 टीएमसी पाणी
काळम्मावाडी धरणातून कर्नाटकला 4 टीएमसी पाणी देण्यात येत होते. यावर्षी हे प्रमाण कमी करण्यात आले आहे. कर्नाटकला आता 3.11 टीएमसी पाणी देण्यात येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. (Hasan Mushrif)
वाढीव पाणीपट्टी भरू नका
शेतकर्‍यांना 200 पट वाढीव पाणीपट्टी लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा आदेश निघेल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी बैठकीत सांगितले. शेतकर्‍यांनी वाढीव पाणीपट्टी भरू नये. नियमित, जुन्या दराने जी पाणीपट्टी आली आहे, तीच भरावी, अशीही सूचना त्यांनी केली. दरम्यान जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हेत्रे यांनी आम्हीही जुनीच पाणीपट्टी भरून घेऊ, असे स्पष्ट केले.
उपशासाठी सोलर यंत्राचा वापर करा
शासनाच्या विविध योजनांमधून शेतकर्‍यांनी सोलर यंत्र बसवून दिवसा पाणी वापर केल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच पैशांची बचतही होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी कुंभोज येथील झालेल्या सोलर प्रकल्पाबाबत उपस्थितांनी माहिती दिली.
तुळशीतील पाणी गरज पडल्यास पंचगंगा, भोगावतीसाठी
तुळशीत 2.16 टीएमसी साठा शिल्लक आहे. गरज पडल्यास तुळशी प्रकल्पातील पाणी पंचगंगा आणि भोगावती नदीत सोडा. तसे नियोजन करा, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या.
असे आहे नियोजन
दूधगंगा प्रकल्प : उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा – 9.30 टीएमसी. गैबी बोगद्यातून सोडण्यात येणारे पाणी – 1.87 टीएमसी. दूधगंगा खोर्‍यात सोडण्यात येणारे पाणी – 6.56 टीएमसी.
राधानगरी प्रकल्प – उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा -5.37 टीएमसी. सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी 4.85 टीएमसी.
वारणा प्रकल्प – उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध पाणीसाठा 6.53 टीएमसी सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी 5.53 टीएमसी.

Latest Marathi News पाणी काटकसरीने वापरा; दर रोटेशननंतर बैठक : पालकमंत्री मुश्रीफ Brought to You By : Bharat Live News Media.