सिंबाच्या विरहात बहीण सुजीनेही त्यागला प्राण; पाटील कुटुंबियांनी केला दोन्ही श्‍वानांचा दशक्रिया विधी

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : आजच्या युगात एकाच कुटुंबातील व्यक्‍ती एकमेकांवर प्रेम करणे तर सोडाच पण एकमेकांचे वैरी झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या कानावर पडतात. पैशासाठी एकमेकांचे खून केल्याच्या घटनाही लपून राहिलेल्या नाहीत. मात्र प्रेम कसे असावे, हे सिंबा आणि सूजी या मुक्या श्‍वान बहीण- भावांनी दाखवून दिले आहे. भाऊ सिंबाच्या मृत्यूची घटना समजताच बहीण सूजीने दुसर्‍याच … The post सिंबाच्या विरहात बहीण सुजीनेही त्यागला प्राण; पाटील कुटुंबियांनी केला दोन्ही श्‍वानांचा दशक्रिया विधी appeared first on पुढारी.

सिंबाच्या विरहात बहीण सुजीनेही त्यागला प्राण; पाटील कुटुंबियांनी केला दोन्ही श्‍वानांचा दशक्रिया विधी

वाळूज, Bharat Live News Media वृत्तसेवा : आजच्या युगात एकाच कुटुंबातील व्यक्‍ती एकमेकांवर प्रेम करणे तर सोडाच पण एकमेकांचे वैरी झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या कानावर पडतात. पैशासाठी एकमेकांचे खून केल्याच्या घटनाही लपून राहिलेल्या नाहीत. मात्र प्रेम कसे असावे, हे सिंबा आणि सूजी या मुक्या श्‍वान बहीण- भावांनी दाखवून दिले आहे. भाऊ सिंबाच्या मृत्यूची घटना समजताच बहीण सूजीने दुसर्‍याच दिवशी आपला प्राण सोडला. हा मनाला गहिवरून टाकणारा प्रसंग सिडको वाळूज महानगर -१ येथे रवीद्र पाटील यांच्या घरी घडला. पाटील कुटुंंबीयांनीही अगदी मनुष्याप्रमाणे रितीरिवाजनुसार रविवारी (दि.१०) कायगाव टोका येथे ब्राह्मणाच्या साक्षीने दोन्ही श्‍वानाचा (सिंबा आणि सूजी) दशक्रिया विधी करुन आजही मुक्या प्राण्यावर घरातील सदस्यासारखं जिवापाड प्रेम करणारी माणसे आहेत, हे दाखवून दिले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर-१ भागात रवींद्र पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी सिंबा नावाचा तीन महीन्याचा कुत्रा (श्वान) व त्याची बहीण सुजी दोघांना ७ ऑगस्ट २०२१ मध्ये घरी आणले. गेली अडीच वर्षे मुलाप्रमाणे त्यांचे पालनपोषण केले. ते दोघे श्‍वान परिवारातील सदस्य बनले होते. कोणत्याही कार्यक्रमात ते मनुष्यासारखे वागत. त्यामुळे अनेकजण त्यांचे मित्र बनले होते. पाटील हे ही मुलगा व मुलीप्रमाणे दोन्ही श्‍वानांची हौस पुरवत. त्यांचा वाढदिवस ही धुमधडाक्यात केल्याचे ते सांगतात. काही दिवसापूर्वी सिंबाला एका मित्राने काही दिवस आपल्याकडे ठेवण्याची मागणी केली. पाटील यांनी मनावर दगड ठेवून २० फेब्रुवारी रोजी रात्री सिंबाला मित्राकडे पाठवले. मात्र अवघ्या दहा दिवसांतच घरापासून व बहीण सूजीपासून दुरावल्याचा विरह सहन न झाल्यने १ मार्च रोजी सिंबाचा मृत्यु झाला.
सिंबाच्या मृत्यूची चर्चा पाटील कुटुंबात होताच हा विरह सहन न झाल्याने दुसर्‍याच दिवशी ३ मार्च रोजी बहीण सुजीनेही आपला प्राण सोडला. हे बहिण भावाचे प्रेम पाहून पाटील कुटुंबीयही शोकसागरात बुडाले. यावेळी त्यांना स्वतःचे आश्रू रोखता आले नाहीत. दोघांचाही जन्म हा एकाच दिवशीचा आणि मृत्युही एका पाठोपाठ झाला. पाटील कुटुंबियांनी प्रथेप्रमाणे जन्मलेल्या ठिकाणी (आडावत ता.चोपडा जि.जळगाव) येथे अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही श्वानाचा हिंदू रितिरिवाजानुसार कायगाव येथे रविवारी गुरुजी दीपक जोशी यांच्या मंत्रोच्चारात दशक्रिया विधी केला. दशक्रिया विधीनंतर सिंबा व सुजीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लाडक्या कुत्र्याच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श करताच पाटील कुटुंबियांनी आश्रुला वाट मोकळी करुन दिली. हा प्रसंग पहाणार्‍यांनाही यावेळी गहिवरुन आले. यापुढे सिंबाच्या स्मृतीत घरासमोर येणार्‍या मुक्या प्राण्यांसह पशु पक्ष्यांना अन्न धान्य,चपाती देणार असल्याचा संकल्प केल्याची माहिती रवींद्र पाटील यांनी दिली.
हेही वाचा :

ह्रदयद्रावक घटना : ३० फूट खोल नाल्यात पडून तीन वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू, भुसावळ शहरातील घटना
हिंगोली : भाटेगाव शिवारात अपघातग्रस्त टेम्पोतील द्राक्ष खाण्यास झुंबड
Nagpur News: मांजराने घेतला चावा, मुलाचा काही तासांत मृत्यू

Latest Marathi News सिंबाच्या विरहात बहीण सुजीनेही त्यागला प्राण; पाटील कुटुंबियांनी केला दोन्ही श्‍वानांचा दशक्रिया विधी Brought to You By : Bharat Live News Media.