दीड हजार एकरवर सभा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवणार : जरांगे

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेला सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा नाही केल्यास येत्या काही दिवसांतच दीड हजार एकरावर मोठी सभा घेवून मराठ्यांची ताकद जगाला दाखवून देवू. त्यासाठी जागेची पाहणी चालू आहे. याकरीता मराठा बांधवांनी टीम तयार करुन गावे पिंजून काढत जनजागृती करावी. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते … The post दीड हजार एकरवर सभा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवणार : जरांगे appeared first on पुढारी.

दीड हजार एकरवर सभा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवणार : जरांगे

पूर्णा: Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेला सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा नाही केल्यास येत्या काही दिवसांतच दीड हजार एकरावर मोठी सभा घेवून मराठ्यांची ताकद जगाला दाखवून देवू. त्यासाठी जागेची पाहणी चालू आहे. याकरीता मराठा बांधवांनी टीम तयार करुन गावे पिंजून काढत जनजागृती करावी. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
पूर्णा तालुक्यातील लिमला येथे आज (दि.११) दुपारी १२ वाजता संवाद बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जे फायद्यासाठी येतात त्यांना फोडता येते, आम्ही निष्ठावान आहोत. आमच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल केले तरी मागे हटणार नाही. एसआयटी चौकशी लावा, आम्ही घाबरणार नाही.
राजकारण हा माझा मार्ग नाही. समाज माझा मालक आहे. मी त्यांचा मुलगा आहे. जेलमध्ये सडेल पण समाजासोबत गद्दारी करणार नाही. यावेळी जरांगे यांचेा लिमला, ताडकळस, वझूर, खंडाळा, माखणी, ईठलापूर येथील माळी समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होते.
हेही वाचा 

परभणी: पेनूर येथून ३४ वर्षीय तरुण बेपत्ता
परभणी : शिरकळस येथे दगड डोक्यात लागून तरुणाचा मृत्यू
परभणी: लोकसभेसाठी पाथरीतील प्रत्येक गावातून २ उमेदवार उभे करणार; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

Latest Marathi News दीड हजार एकरवर सभा घेऊन मराठ्यांची ताकद दाखवणार : जरांगे Brought to You By : Bharat Live News Media.