Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबई संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने आपल्या दुस-या डावात अजिंक्य रहाणे (नाबाद 58) आणि मुशीर खान (नाबाद 51) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 260 धावांची आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, सोमवारी सामन्याच्या दुस-या दिवशी मुंबईच्या भेदक मा-यापुढे विदर्भचा टीकाव लागला नाही. त्यांचा संघ अवघ्या 105 धावांत ऑलआऊट झाला. त्यामुळे मुंबई संघाला 119 धावांची आघाडी मिळाली. मुंबईसाठी धवल कुलकर्णी, मुलानी आणि कोटियनने 3-3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुलला 1 बळी मिळाला.
मुंबईच्या दुस-या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात 46 धावा करणाऱ्या पृथ्वी शॉच्या रूपाने मुंबईला पहिला धक्का बसला. तो 18 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर मुंबईला दुसरा झटका भूपेन लालवाणीच्या रूपाने 34 धावांवर बसला. लालवानी 18 धावा करून बाद झाला. यानंतर रहाणे आणि मुशीरने डाव सांभाळला. दिवसाअखेर 50 षटकांत 2 बाद 141 धावा केल्या.
The post Ranji Trophy Final : मुंबईकडे 260 धावांची आघाडी, विदर्भ ‘बॅकफूट’वर appeared first on Bharat Live News Media.
Ranji Trophy Final : मुंबईकडे 260 धावांची आघाडी, विदर्भ ‘बॅकफूट’वर