‘धोनीच्या निवृतीनंतर हिटमॅन रोहित होईल CSK चा कर्णधार’

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 17 वा हंगाम हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंवर असतील. पहिले नाव रोहित शर्माचे आहे, जो यावेळी फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर दुसरे नाव एमएस धोनीचे आहे, ज्याचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. दरम्यान, सीएसकेचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने रोहित शर्मा … The post ‘धोनीच्या निवृतीनंतर हिटमॅन रोहित होईल CSK चा कर्णधार’ appeared first on पुढारी.

‘धोनीच्या निवृतीनंतर हिटमॅन रोहित होईल CSK चा कर्णधार’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 17 वा हंगाम हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंवर असतील. पहिले नाव रोहित शर्माचे आहे, जो यावेळी फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर दुसरे नाव एमएस धोनीचे आहे, ज्याचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. दरम्यान, सीएसकेचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने रोहित शर्मा आणि एमएस धोनीबाबत मोठे विधान केले आहे. ज्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
रायडूने म्हणाला की, ‘रोहित शर्माला 2025 मध्ये सीएसकेकडून खेळताना पाहायला आवडेल. एवढेच नाही तर एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर हिटमॅनने सीएसकेचे नेतृत्व करावे अशी इच्छा आहे,’ असे मत त्याने एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
यंदाच्या आयपीएल पूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरात टायटन्सकडून (जीटी) ट्रेड केल्यानंतर तो मुंबई संघात आला आहे. त्यानंतर पंड्याला थेट कर्णधार करण्यात आले. यावर रायडू म्हणाला, ‘आयपीएल 2022 पूर्वी पंड्याला मुंबई इंडियन्सने सोडले होते. त्यानंतर तो गुजरात टायटन्स (GT) या नव्या संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली जीटीला पहिल्या सत्रात चॅम्पियन बनता आले, तर सलग दुस-याच हंगामात संघ उपविजेता ठरला. असे असले तरी एमआयचे नेतृत्व करणे हार्दिक पंड्यासाठी सोपे नसेल.’
‘मला वाटते एमआयने नेतृत्व बदल करण्यात घाई केली आहे. पंड्याला कर्णधार बनवण्यापेक्षा यंदाच्या हंगामात रोहितकडे नेतृत्व कायम ठेवणे गरजेचे होते. पंड्यानेही पुढच्या वर्षी कर्णधारपद स्वीकारले असते तर बरे झाले असते, कारण रोहित अजूनही टीम इंडियाचा कर्णधार आहे,’ असा सल्लाही त्याने यावेळी दिला.
‘रोहित पुढील 5 ते 6 वर्षे खेळू शकतो. मला त्याला भविष्यात सीएसकेकडून खेळताना पाहायचे आहे. जेव्हा एमएस धोनी निवृत्त होईल तेव्हा त्या सीएसकेचे कर्णधारपद स्वीकारावे, असे मला वाटते,’ असेही मत रायडूने व्यक्त केले.
Latest Marathi News ‘धोनीच्या निवृतीनंतर हिटमॅन रोहित होईल CSK चा कर्णधार’ Brought to You By : Bharat Live News Media.