बिल गेटसची भेट अन् डॉली चायवाल्याचे आयुष्यच बदलले!
न्यूयॉर्क : बिल गेटसनी ज्याच्या चहा स्टॉलला भेट दिली आणि त्या स्टॉलवरील चहाचा आनंद घेतला, त्या डॉली चहावाल्याचे अक्षरश: आयुष्यच बदलले. डॉली चहावाला हा बिल गेटसनी त्याच्या स्टॉलला भेट देईतोवर साधा स्टॉलवाला होता. पण, बिल गेटस येऊन गेले आणि सारी समीकरणे बदलून गेली.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या बिल गेटस त्याच्या स्टॉलवर आले, त्यावेळी त्यांनी डॉलीसह एक रील शूट केला आणि त्या शूटमुळे डॉलीचे आयुष्य बदलून गेले. बिल गेटस येऊन गेल्यानंतर आता डॉलीला फक्त पाहण्यासाठी गर्दी होते आहे.
एरवी डॉली फक्त आपल्या युनिक स्टाईलसाठी अधिक ओळखला जात असे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओंना उत्तम व्ह्यूज मिळायचे. त्याची सारी मिळकत मात्र चहा विक्रीवर अवलंबून होती. बिल गेटसच्या एका व्हिडीओने या सार्या समीकरणांची बरीच उलथापालथ झाली.
याच डॉलीची लँबॉर्गिनी कारसोबतची काही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. गाडीमध्ये बसून पैशांची बंडले दाखवताना या व्हिडीओत दाखवले गेले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा बिल गेटस जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी भारतात आले असताना त्यांनी डॉली चायवाल्याची भेट घेतली होती. गेटस यांनी त्यांच्या व्हिडीओत त्याच्या चहाचे मनमुराद कौतुक केले. त्यानंतर त्याच्या टपरीवर चहा पिण्यासाठी प्रचंड गर्दी होते आहे; शिवाय त्याचे फॅन फॉलोईंगही वाढले आहेत.
Latest Marathi News बिल गेटसची भेट अन् डॉली चायवाल्याचे आयुष्यच बदलले! Brought to You By : Bharat Live News Media.