मोठी बातमी : ‘भोजशाळा’ संकुलाच्‍या पुरातत्व सर्वेक्षणास उच्‍च न्‍यायालयाची परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्‍यास इंदूर उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने परवानगी दिली आहे. तसेच भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद परिसराची संपूर्ण वैज्ञानिक तपासणी, सर्वेक्षण आणि उत्खनन करुन सहा आठवड्यांमध्‍ये अहवाल सादर करावा, असेही आपल्‍या आदेशात खंडपीठाने … The post मोठी बातमी : ‘भोजशाळा’ संकुलाच्‍या पुरातत्व सर्वेक्षणास उच्‍च न्‍यायालयाची परवानगी appeared first on पुढारी.
मोठी बातमी : ‘भोजशाळा’ संकुलाच्‍या पुरातत्व सर्वेक्षणास उच्‍च न्‍यायालयाची परवानगी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्‍यास इंदूर उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने परवानगी दिली आहे. तसेच भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद परिसराची संपूर्ण वैज्ञानिक तपासणी, सर्वेक्षण आणि उत्खनन करुन सहा आठवड्यांमध्‍ये अहवाल सादर करावा, असेही आपल्‍या आदेशात खंडपीठाने नमूद केल्‍याचे वृत्त ‘ANI’ने दिले आहे.
खंडपीठाने आपल्‍या आदेशात म्‍हटलं आहे की, भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्‍यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक किंवा अतिरिक्त महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली ASI च्या पाच किंवा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तज्ञ समिती तयार करावी. त्‍यांनी सर्वेक्षणाचा योग्य कागदोपत्री अहवाल सहा आठवड्यांच्या आत न्यायालयात सादर करावा.
संकुलातील भूगर्भातील संरचनांचे कालावधी निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग पद्धतीने सविस्तर वैज्ञानिक तपासणी केली जावी. प्रत्येक बाजूने नामनिर्देशित केलेल्या दोन प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वेक्षणाच्या कार्यवाहीचे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यात यावी, असेही न्‍यायालयाने आपल्‍या आदेशसात स्‍पष्‍ट केले आहे.
काय आहे ‘भोजशाळा’ वाद?
धार भोजशाळेत सरस्वती देवीची मूर्ती बसवण्याची आणि संपूर्ण संकुलाची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी करणारी याचिका इंदूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली हाेती . तसेच येथील नमाज बंद करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

Advocate Vishnu Shankar Jain tweets, “My request for ASI survey of bhojshala/dhar in Madhya Pradesh is allowed by Indore High Court…” pic.twitter.com/MzJdLbCDq5
— ANI (@ANI) March 11, 2024

Latest Marathi News मोठी बातमी : ‘भोजशाळा’ संकुलाच्‍या पुरातत्व सर्वेक्षणास उच्‍च न्‍यायालयाची परवानगी Brought to You By : Bharat Live News Media.