सेन्सेक्स ६१६ अंकांनी घसरला, ‘स्मॉलकॅप’ला मोठा फटका

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात सोमवारी (दि.११) जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आले. यामुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरले. सेन्सेक्स ६१५ अंकांनी घसरून ७३,५०२ वर बंद झाला. तर निफ्टी १६० अंकांच्या घसरणीसह २२,३३२ वर स्थिरावला. आज बँकिग शेअर्सना मोठा फटका बसला. तर फार्मा क्षेत्रात खरेदीची नोंद झाली. फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल चिन्हात बंद झाले. … The post सेन्सेक्स ६१६ अंकांनी घसरला, ‘स्मॉलकॅप’ला मोठा फटका appeared first on पुढारी.
सेन्सेक्स ६१६ अंकांनी घसरला, ‘स्मॉलकॅप’ला मोठा फटका

Bharat Live News Media ऑनलाईन : शेअर बाजारात सोमवारी (दि.११) जोरदार प्रॉफिट बुकिंग दिसून आले. यामुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरले. सेन्सेक्स ६१५ अंकांनी घसरून ७३,५०२ वर बंद झाला. तर निफ्टी १६० अंकांच्या घसरणीसह २२,३३२ वर स्थिरावला. आज बँकिग शेअर्सना मोठा फटका बसला. तर फार्मा क्षेत्रात खरेदीची नोंद झाली. फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल चिन्हात बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस, बँक, आयटी, रियल्टी, मेटल आणि पॉवर ०.५ ते १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.२४ टक्क्यांनी खाली आला. तर बीएसई स्मॉलकॅप २ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)
हेवीवेट स्टॉक्समध्ये घसरण
सेन्सेक्स आज ७४,१७५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,५०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एसबीआय, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एनटीपीसी, टाटा मोटर्स हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

निफ्टी टाटा कन्झ्युमर, बजाज ऑटो, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एसबीआय हे शेअर्स घसरले. तर अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, सिप्ला, एसबीआय लाईफ, ब्रिटानिया हे शेअर्स वधारले.
SME सेगमेंटमधील शेअर्सवर विक्रीचा दबाव
एसएमई सेगमेंटमधील शेअर्सवर आज विक्रीचा दबाव राहिला. कारण ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी आज (दि. ११) सांगितले की बाजार नियामकाला “SME सेगमेंटमध्ये फेरफार झाल्याची चिन्हे दिसून आली आहेत. एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना बुच म्हणाल्या, “आम्हाला एसएमई सेगमेंटमध्ये फेरफारीची चिन्हे दिसत आहेत. आम्ही ठोस पुरावे मिळवण्यासाठी काम करत आहोत.” यानंतर एसएमई सेगमेंटमधील शेअर्सवर परिणाम दिसून आला.
निफ्टी बँकमध्ये घसरण
निफ्टी बँक १ टक्क्यांहून अधिक घसरला. निफ्टी बँकमध्ये एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक, बंधन बँक, एचडीएफसी बँक यांचे अधिक नुकसान झाले. दरम्यान, AU Small Finance Bank शेअर्स तेजीत राहिला. तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसही खाली आला.
सुप्रीम कोर्टाच्या झटक्यानंतर एसबीआयचे शेअर्स घसरले
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर्स आज सुमारे २ टक्क्यांच्या जवळपास घसरले. एनएसईवर हा शेअर्स १.७९ टक्के घसरणीसह ७७३.९५ रुपयांपर्यंत खाली आला. निवडणूक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड) माहिती देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला १२ मार्चपर्यंत इलेक्टोरल बाँडचे तपशील निवडणूक आयोगाला देण्याचे तसेच आयोगाने हे सर्व तपशील १५ मार्चपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या झटक्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आणि एसबीआयचे शेअर्स घसरले. (State Bank of India Share Price)
झोमेटॉचे नुकसान
झोमॅटोचा शेअर्स सोमवारी ७ टक्क्यांनी घसरून NSE वर १४९ रुपयांच्या निचांकी पातळीवर पोहोचला. (Zomato Share Price) त्यानंतर हा शेअर्स १५५ रुपयांवर आला. (Stock Market Closing Bell)
जपानच्या शेअर बाजारात हाहाकार
जपानचा शेअर्स निर्देशांक निक्केईला सोमवारी मोठा फटका बसला. मजबूत येन आणि सेमीकंडक्टर शेअर्समधील विक्रीमुळे निक्केई आजच्या ट्रेडिंग सत्रात ३ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यानंतर बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक २.१९ टक्के म्हणजेच ८६८.४५ अंकांनी घसरून ३८,८२०.४९ वर बंद झाला, तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक २.२० टक्क्यांनी घसरून २,६६६.८३ वर बंद झाला. बँक ऑफ जपानकडून व्याजदरवाढीचे संकेत आणि प्रॉफिट बुकिंगमुळे निक्केई आज कोसळला.
हे ही वाचा ;

शेअर मार्केटमध्ये २८ मार्चपर्यंत T+0 ट्रेड सेटलमेंट सुरु होणार
FPIS ची भारतातील ऑटो शेअर्समधील गुंतवणूक वाढली
अर्थवार्ता : ‘या’ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
नियोजन : मार्च महिना आला, खिसा, पाकीट सांभाळा !

 
Latest Marathi News सेन्सेक्स ६१६ अंकांनी घसरला, ‘स्मॉलकॅप’ला मोठा फटका Brought to You By : Bharat Live News Media.