Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अजय देवगन-आर माधवनचा चित्रपट ‘शैतान’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला. तर तिसऱ्या दिवशीदेखील ‘शैतान’ने जबरदस्त कमाई केली. (Shaitaan Movie ) या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून जबरदस्त रिव्ह्युज मिळाले. यामध्ये अजय देवगन, आर माधवन आणि ज्योतिका यांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळत आहे. (Shaitaan Movie )
रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.५० कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी १८.२५ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. तर तिसऱ्या दिवशी ‘शैतान’ने २०.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर ‘शैतान’ने तीन दिवसांत एकुण ५४ कोटी रुपयांचे दमदार कलेक्शन केलं आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आङे. आर माधवनची काळी जादू कशी चालते, हे ‘शैतान’मध्ये पाहायला मिळते. ज्योति देशपांडे, कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक यांची निर्मिती आहे. याशिवाय अजयचे ५ चित्रपट रिलीज होत आहेत.
अजय देवगन ‘औरों में कहां दम था’ आणि ‘मैदान’ चित्रपटात दिसणार असून हे चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहेत. ‘सिंघम अगेन’ ऑगस्ट आणि चित्रपट ‘रेड २’ नोव्हेंबरमध्ये रिलीज होतील. आर माधवनकडे शशिकांतचा क्रिकेट ड्रामा, ‘टेस्ट’, ‘अधिष्ठासली’ आणि ‘जीडी नायडू बायोपिक’ प्रोजेक्ट आहेत.
Latest Marathi News ‘शैतान’ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई? अजय-ज्योतिका.. Brought to You By : Bharat Live News Media.
‘शैतान’ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई? अजय-ज्योतिका..