नागपूर: मांजराने घेतला चावा, मुलाचा काही तासांत मृत्यू
नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : मांजराने चावा घेतल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. श्रेयांशू क्रिष्णा पेंदाम (वय ११) असे मृत मुलाचे नाव आहे. हिंगणा तालुक्यातील उखळी गावात ही घटना शनिवारी (दि.९) सायंकाळी घडली. मांजराने हल्ला केल्यानंतर श्रेयांशूचा काही तासांतच मृत्यू झाला. Nagpur News
उखळीचे रहिवासी असलेल्या श्रेयांशू याच्यावर खेळता खेळता मांजराने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. श्रेयांशू खेळत असताना त्याचा मांजराने चावा घेतला. त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे श्रेयांशूच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. Nagpur News
हेही वाचा
धक्कादायक : अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रॅव्हलरवर अंदाधुद गोळीबार; चालकासह ४ प्रवासी जखमी
नागपूर : मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला भीषण आग; वारसा साहित्य जळून खाक
नागपूर : कर्ज घेऊन चाललाय भाजपचा दिवाळी सण : नाना पटोले
Latest Marathi News नागपूर: मांजराने घेतला चावा, मुलाचा काही तासांत मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.