गाझीपूरमध्ये भीषण अपघात; बसवर हाय टेंशन वायर पडून लागली आग; अनेकांचा जळून मृत्यू

गाझीपूर ; Bharat Live News Media ऑनलाईन उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. चालल्या बसवर हाय टेंशन वायर पडल्याने बसला आग लागली. या दुघटटणेत जवळपास ६ लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. एका लग्न सोहळ्यातून लोक या बसमधून परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत.
बस मऊ च्या कोपागंज येथून लग्नाची मिरवणूक घेऊन मरदह येथील महाहर धाम धाम येथे येत होती. यावेळी कच्च्या रस्त्यावरून येणाऱ्या बसचा अपघात झाला. या बसमध्ये ३५ हून अधिक लोक होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. आगीत जळालेल्या लोकांना उपचारांसाठी तात्काळ रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा :
Karnataka bans gobi manchurian | कर्नाटकात गोबी मंच्युरिअन, कॉटन कँडीवर बंदी, काय कारण?
Rahul Kaswan joins Congress : राजस्थानातील भाजप खासदार राहुल कासवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Manoj Jarange patil | …तर सुफडासाफ करणार; मनोज जरांगेंचा इशारा
The post गाझीपूरमध्ये भीषण अपघात; बसवर हाय टेंशन वायर पडून लागली आग; अनेकांचा जळून मृत्यू appeared first on Bharat Live News Media.
