
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. ४१ वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलेला मुंबईचा संघ आणि दोनवळा चॅम्पियन ठरलेला विदर्भ यांच्यात सुरु असलेल्या अंमित सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यामुळे मुंबई संघाला 119 धावांची आघाडी मिळाली आहे. ( Ranji Trophy Final Match Day-2 )
Ranji Trophy Final Match Day-2: विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गुंडाळला
प्रथल फलंदाजीला आमंत्रण मिळालेला मुंबईचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला होता. मुंबईला कमी धावांवर रोखल्याचे विदर्भाचा आनंद अल्पकाळच टिकला. कारण पहिल्या दिवशी विदर्भाचे तीन खेळाडू तंबूत परतले. शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. ( Ranji Trophy Final Match Day-2 )
आज ( दि. ११ मार्च) विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. अथर्व तायडेच्या रूपाने विदर्भाला चौथा धक्का बसला. धवल कुलकर्णीने त्याला तंबूत धाडले. त्याने २३ धाावंचे योगदान दिले. यानंतर शम्स मुलाणी याने विदर्भच्या संघाला खिंडार पाडले. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना बाद केले. आदित्यला १९, अक्षयला पाच आणि हर्षन केवळ एक धाव केली. तनुषने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विदर्भाकडून यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने तीन बळी घेतले. तर शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी तीन तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. ( Ranji Trophy Final Match Day-2 )
मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर संपुष्टात
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाची सुरुवात दमदार झाली होती. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. मात्र यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.
रहाणे आणि श्रेयस पुन्हा फ्लॉप
टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेले रहाणे आणि श्रेयस रणजी स्पर्धेत पुन्हा फ्लॉप ठरले. हे दोघेही तामिळनाडूविरुद्धच्या रणजी उपांत्य फेरीत फ्लॉप ठरले होते. तर मुंबईचा पहिला डाव शार्दुल ठाकूरने सावरला. त्याने 69 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. तनुष कोटियन आठ धावा करून बाद झाला तर तुषार देशपांडे १४ धावा करून बाद झाला. मुंबईचा डाव 224 धावांवर आटोपला. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन , उमेश यादवने २ तर आदित्य ठाकरेने एक विकेट घेतली.
हेही वाचा :
Ranji Trophy 2024 : मुंबईची विक्रमी 48व्यांदा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये धडक!
Ranji Trophy 2024 : मुंबईच्या फलंदाजांची कमाल! 10व्या-11व्या क्रमांकावर खेळत ठोकली शतके, 78 वर्षांनंतर चमत्कार
Ranji Trophy Final : उनाडकटने बंगालला लोळवले, सौराष्ट्रने रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले
Latest Marathi News Ranji Trophy Final : विदर्भ ‘बॅकफूट’वर, मुंबईला ११९ धावांची आघाडी Brought to You By : Bharat Live News Media.
