तोंड बांधून आलेल्या टोळक्याने ‘तो’ टोलनाका दिला पेटवून, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

जळगाव : पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सबगव्हाण गावाजवळ दोन दिवसांपूर्वी टोल नाका सुरू झालेला होता. आज दि. 11 सकाळी कारमधून आलेल्या अज्ञातांनी पेट्रोल टाकून केबिन पेटवून दिली व तेथील सामानाची तोडफोड केली.परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या आशिवा हायवे क्रमांक ४६ वर तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी … The post तोंड बांधून आलेल्या टोळक्याने ‘तो’ टोलनाका दिला पेटवून, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद appeared first on पुढारी.
तोंड बांधून आलेल्या टोळक्याने ‘तो’ टोलनाका दिला पेटवून, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

जळगाव : पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सबगव्हाण गावाजवळ दोन दिवसांपूर्वी टोल नाका सुरू झालेला होता. आज दि. 11 सकाळी कारमधून आलेल्या अज्ञातांनी पेट्रोल टाकून केबिन पेटवून दिली व तेथील सामानाची तोडफोड केली.परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या आशिवा हायवे क्रमांक ४६ वर तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता, पाळधी ते तरसोद बायपाससह या मार्गावरील अनेक भागांचे काम बाकी असतांना हा टोल नाका सुरू करणे चुकीचे आहे. तथापि, टोल नाका दिनांक १० मार्चपासून सुरू करण्यात आलेला आहे. यातच या टोलचे दर हे सर्वसामान्य वाहनधारकांना परवडणारे नसल्याने याच्या विरोधात परिसरात क्षोभ उसळला आहे.
दि.11 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एका विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या व आपले तोंड फडक्याने झाकलेल्या टोळक्याने कॅबिनमध्ये पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून दिली. यानंतर त्यांनी दुसर्‍या कॅबिनसह अन्य भागांची तोडफोड करत पलायन केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झालेला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडालेली आहे. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी टोल नाक्याची पाहणी केली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
Latest Marathi News तोंड बांधून आलेल्या टोळक्याने ‘तो’ टोलनाका दिला पेटवून, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद Brought to You By : Bharat Live News Media.