पायलट झोपले, विमानाने हेलकावे खाताच आली जाग
जकार्ता : वृत्तसंस्था : इंडोनेशियाच्या विमानाचे दोन्ही पायलट चक्क विमान ( plane ) उडवतानाच झोपी गेले. अर्धा तास ते झोपले. पण हवेत भरकटल्यानंतर या विमानाला हेलकावे बसू लागताच ते खडबडून जागे झाले. त्यांनी विमान सुखरूप उतरवले असले तरी या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीने ‘मविआ’त वाद
‘SBI’ने २६ दिवस काय केले?’: Electoral Bonds प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेले ठळक मुद्दे
नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नको : काँग्रेसच्या जया ठाकूर यांची सुप्रीम काेर्टात याचिका
सुलावेसी येथून जकार्ताला जाणार्या बाटीक एअर कंपनीच्या विमानात 153 प्रवासी व चार क्रू मेंबर होते. अडीच तासांच्या या प्रवासासाठी विमानाने उड्डाण केल्यावर दोन्ही पायलट चक्क ढाराढूर झोपी गेले. या काळात विमान निर्धारित मार्गापासून हटले व तिसरीकडेच जात असल्याचे पाहून त्यांना विमानतळांच्या नियंत्रण कक्षांतून संपर्कही केला गेला. पण त्यांना जाग आली नाही. अखेर वातावरण बिघडल्याने विमान हेलकावे खायला लागले.
त्यामुळे हे पायलट खडबडून जागे झाले. त्यांनी चूक निस्तरत विमान सुखरूप जकार्ता विमानतळावर उतरवले. इंडोनेशियाच्या हवाई वाहतूक प्रशासनाने या दोघांची चौकशी सुरू करून त्या दोघांना निलंबित केले आहे.
Latest Marathi News पायलट झोपले, विमानाने हेलकावे खाताच आली जाग Brought to You By : Bharat Live News Media.