शिवाजी पार्कात फुटणार मविआच्या प्रचाराचा नारळ!

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा शिवाजी पार्कवर होत आहे. 17 मार्च रोजी होणार्या सभेसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. या सभेतून इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसने समन्वय समिती स्थापन केली आहे. राहुल गांधी यांचे मुंबईत भव्य स्वागत तसेच शिवाजी पार्कवरील सभाही ऐतिहासिक करण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याची माहिती सभेच्या समन्वय समितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या
Oscars 2024 : RRR ची सलग दुसऱ्यांदा जादू, ‘नाटू नाटू’सह राम चरण, ज्यु. एनटीआरची जादू
LokSabha Election : लोकसभा निवडणुकीची लगीनघाई!; दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचा सपाटा
नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नको : काँग्रेसच्या जया ठाकूर यांची सुप्रीम काेर्टात याचिका
या सभेसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकार्यांची बैठक मुंबईत पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नसीम खान म्हणाले, इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राने अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. आता न्याय यात्रा व शिवाजी पार्कवरील सभेलाही प्रचंड जनसमर्थन मिळेल, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला आहे.
आजच्या या बैठकीला खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सहप्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, नाना गावंडे, अमरजित मनहास, अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Latest Marathi News शिवाजी पार्कात फुटणार मविआच्या प्रचाराचा नारळ! Brought to You By : Bharat Live News Media.
