ग्रामीण भागात शेताच्या बांधावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला

नाशिक (सिन्नर, विंचुरी दळवी) : Bharat Live News Media वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे बिबट्याच्या मादीच्या पाच ते सहा महीन्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विंचूरी दळवी येथे सोमवार (दि.११) सकाळच्या सुमारास विंचुरी दळवी परीसरातील गट.नं.499 शेरी मळा येथील भागात रमेश शेळके यांच्या शेतातील बांधावर चार ते पाच वय वर्ष असलेला बिबट्या मादीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला आहे.
सोमवार (दि.११) सकाळच्या सुमारास रमेश शेळके व गोविंद दळवी हे त्यांच्या शेतातील गहू पिकावर लक्ष देण्यासाठी शेतात गेले असता त्यांना बिबट्या मादीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ दै. Bharat Live News Mediaच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत वन अधिकारी मनिषा जाधव यांना माहीती दिली. त्यानंतर तातडीने वनरक्षक गाढवे व वनसेवक रामदास हरळे यांना घटनास्थळी येऊन पाहणी केली. या बछड्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून शवविच्छेदनानंतर पुढील तपास लागणार आहे अशी माहीती वन कर्मचार्यांनी दिली आहे.
विंचुरी दळवी : मृत बिबट्याची पाहणी करताना वन कर्मचारी. (छाया : विकास दळवी)
Latest Marathi News ग्रामीण भागात शेताच्या बांधावर बिबट्या मृत अवस्थेत आढळला Brought to You By : Bharat Live News Media.
