
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हरियाणातील रेवाडी येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात ६ जण ठार झाले. कारची स्टेपनी बदलाताना ही दुर्घटना घडली. मृत हे एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत. देवदर्शन करुन गाझियाबादला परत येत असताना ही दुर्घटना घडली.
गाझियाबादच्या अजनारा ग्रीन सोसायटीत राहणारे खातू धामला देवदर्शनासाठी गेले होते. खातू श्यामचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण इनोव्हा बुक करून दिल्लीहून निघाले होते. रेवाडीहून धरुहेरा रस्त्याने जात असताना मसाणी गावाजवळ त्यांची कार पंक्चर झाली. ड्रायव्हर आणि इतर पंक्चर झालेल्या स्टेपनीला बदलण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक रस्त्याच्या कडेला गाडीजवळ बसले होते तर काही लोक गाडीच्या आत बसले होते.
‘एसयूव्ही’ची भीषण धडक
मसाणी गावाजवळ इनोव्हा चालक स्टेपनी बदलत होता तर त्याच्या शेजारी पाच जण उभे होते. यावेळी एका एसयूव्हीने त्यांना भीषण धडक दिली. या अपघाता चालक विजय, शिखा, पूनम, नीलम आणि रंजना कपूर हे जागीच ठार झाले. एसयूव्हीमधील पाच जण जखमी झाले आहेत.
#WATCH | Haryana | Six people died, six injured in a road accident in Rewari last night. The incident occurred when the occupants of the car were changing its tyres and were hit by another car coming from behind. pic.twitter.com/0naO2WsdPy
— ANI (@ANI) March 11, 2024
Latest Marathi News कारची ‘स्टेपनी’ बदलताना काळाचा घाला, भीषण अपघातात ६ ठार Brought to You By : Bharat Live News Media.
