ईडीची कारवाई झालेले ८५ टक्के नेते विरोधी पक्षातले : शरद पवार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना एकप्रकारे धमकी दिली जात आहे. ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्यात एकही भाजपचा नेता नाही. कारवाई झालेले ८५ टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत. ईडीने चौकशी केलेल्या ५ हजार ९०६ केसेसपैकी केवळ २५ प्रकरणांचाच निर्णय झाला, असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आज (दि.११) पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, अजित पवार गटातील निलेश लंके यांच्या पुन्हा प्रवेशाच्या चर्चेबद्दल काही अर्थ नाही. त्याबाबत मला काही माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
“काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांवर कधीही चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली नाही. तेव्हा स्वत:च्या नेत्यांवरही कारवाया झाल्या. मात्र, सध्या ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्यात एकही भाजपचा नेता नाही. निवडणुकीच्या तोंडावर ईडी, सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. ईडीचा वापर करून निवडणुकीआधी विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्यांवर खोटे आरोप करून त्रास दिला जातो. ईडीची कारवाई विरोधकांवरच कशी होते, असा सवाल करत शरद पवार यांनी रोहीत पवारांवरील ईडीची कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर, हातकणंगलेबाबत ‘मविआ’त मतभेद
राज ठाकरेंच्या ‘१५ मिनिटांचा’ कॉलवरून चर्चेला उधाण; लोकसभेच्या घोषणेला पूर्णविराम
महायुती जागावाटपावर मुंबईत पुन्हा खलबते
Latest Marathi News ईडीची कारवाई झालेले ८५ टक्के नेते विरोधी पक्षातले : शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.