3 वर्षांपासून अनवाणी; आता पायांचे मार्केटिंग!

बर्लिन : नेहमी आपण कोरड्या जमिनीवर किंवा गवतावर थोडा वेळ अनवाणी चालावे, याचे बरेच फायदे असतात, असे नेहमी सांगितले जाते आणि याची बरीच कारणे देखील आहेत. काही जण एखादा पण करून कायम अनवाणी चालतात. पण, एक अवलिया असाही आहे, जो मागील 3 वर्षांपासून अनवाणी चालत आला आहे आणि आता तो आपल्या पायाचे फोटो पोस्ट करून … The post 3 वर्षांपासून अनवाणी; आता पायांचे मार्केटिंग! appeared first on पुढारी.

3 वर्षांपासून अनवाणी; आता पायांचे मार्केटिंग!

बर्लिन : नेहमी आपण कोरड्या जमिनीवर किंवा गवतावर थोडा वेळ अनवाणी चालावे, याचे बरेच फायदे असतात, असे नेहमी सांगितले जाते आणि याची बरीच कारणे देखील आहेत. काही जण एखादा पण करून कायम अनवाणी चालतात. पण, एक अवलिया असाही आहे, जो मागील 3 वर्षांपासून अनवाणी चालत आला आहे आणि आता तो आपल्या पायाचे फोटो पोस्ट करून प्रत्येक महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांची कमाई करतो आहे.
तसे पाहता, अनेकांना शूज आणि चप्पल काढायला आवडत नाही. घरातही लोक चप्पल घालतात. पण, एका विदेशी व्यक्तीने चप्पल आणि शूज वापरणे पूर्णपणे बंद केले आहे. आता तो आपल्या विद्रूप पायांचे फोटो सोशल मीडियावर विकून पैसे कमवत आहे. तो एवढा पैसा कमावतो आहे की, त्याची कमाई देखील थक्क करणारी आहे.
जॉर्ज अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत होता. त्याला काहीतरी वेगळे अनुभवायचे होते. जेव्हा त्याने आपल्या सर्व चप्पल फेकून दिल्या तेव्हा त्याच्या घरच्यांना वाटले की तो वेडा झाला आहे; पण आता तो त्याच्या पायामुळे पैसे कमवत आहे. यादरम्यान त्याची भेट 20 वर्षांची रोझेनशी झाली. यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. काही महिन्यांनंतर ही तरुणीही अनवाणी राहू लागली. आतापर्यंत अनेक वेळा त्यांच्या पायाला खडे, काचा टोचले. यामुळे अनेकदा त्रासही झाला. मात्र, आता आपल्याला याची सवय झाली असल्याचे या उभयतांचेही म्हणणे आहे.
Latest Marathi News 3 वर्षांपासून अनवाणी; आता पायांचे मार्केटिंग! Brought to You By : Bharat Live News Media.