पृथ्वीवर आदळणार अंतराळातील खराब बॅटर्‍या

बर्लिन : पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून जानेवारी 2021 मध्ये टाकण्यात आलेल्या 9 बॅटर्‍या आता पृथ्वीवर आदळणार आहेत. या सर्व बॅटर्‍यांचे एकत्रित वजन 2.5 टन इतके आहे. मात्र, या बॅटरीचा पृथ्वीला काहीही धोका असणार नाही. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या बॅटर्‍या नष्ट होणार असल्याने यापासून काहीही धोका राहणार नाही, असे अभ्यासकांचा होरा … The post पृथ्वीवर आदळणार अंतराळातील खराब बॅटर्‍या appeared first on पुढारी.

पृथ्वीवर आदळणार अंतराळातील खराब बॅटर्‍या

बर्लिन : पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून जानेवारी 2021 मध्ये टाकण्यात आलेल्या 9 बॅटर्‍या आता पृथ्वीवर आदळणार आहेत. या सर्व बॅटर्‍यांचे एकत्रित वजन 2.5 टन इतके आहे. मात्र, या बॅटरीचा पृथ्वीला काहीही धोका असणार नाही. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या बॅटर्‍या नष्ट होणार असल्याने यापासून काहीही धोका राहणार नाही, असे अभ्यासकांचा होरा आहे.
या सर्व बॅटर्‍यांवर आपले बारीक लक्ष असल्याचे युरोपियन स्पेस एजन्सीजनी यावेळी म्हटले आहे. या सर्व बॅटर्‍या निकेल व हायड्रोजनचे आहेत. त्यांच्या जागी आता लिथियम-आयनच्या बॅटर्‍या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना 20 मे 2020 रोजी जपानच्या एचटीव्ही-9 सॅटेलाईटच्या माध्यमातून पाठवून देण्यात आले होते. हॉवर्ड स्मिथ सोनियम सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्समधील खगोेल शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडावेल यांनी सर्व बॅटर्‍या पृथ्वीच्या कक्षेत केव्हा येतील, याचा अचूक अंदाज वर्तवणे कठीण असल्याचे याप्रसंगी म्हटले आहे.
Latest Marathi News पृथ्वीवर आदळणार अंतराळातील खराब बॅटर्‍या Brought to You By : Bharat Live News Media.