कोल्हापूर : झूम प्रकल्पात आता २५ मेट्रिक टन कचर्‍यावर होणार प्रक्रिया

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा येथील झूम प्रकल्पात आता दररोज एकूण 25 मेट्रिक टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी 5 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. आता दुसर्‍या 20 मेट्रिक टन प्रकल्पाला राज्य शासनाने शासकीय मान्यता दिली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बायोगॅस प्रकल्पाचा प्रस्ताव … The post कोल्हापूर : झूम प्रकल्पात आता २५ मेट्रिक टन कचर्‍यावर होणार प्रक्रिया appeared first on पुढारी.

कोल्हापूर : झूम प्रकल्पात आता २५ मेट्रिक टन कचर्‍यावर होणार प्रक्रिया

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : कसबा बावडा येथील झूम प्रकल्पात आता दररोज एकूण 25 मेट्रिक टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी 5 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. आता दुसर्‍या 20 मेट्रिक टन प्रकल्पाला राज्य शासनाने शासकीय मान्यता दिली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बायोगॅस प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला राज्याच्या तांत्रिक समितीने 8 जानेवारी 2024 रोजी झालेल्या नवव्या बैठकीत मान्यता दिली होती. 4 कोटी 41 लाख 61 हजार 883 रुपयांचा या प्रस्तावाला आता राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेने या प्रकल्पासाठी निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पाला येणार्‍या खर्चापैकी 1 कोटी 18 लाख 80 हजार रुपयांचा निधी केंद्र शासनाचा हिस्सा आहे. 1 कोटी 33 लाख 20 हजार रुपये राज्य शासन आपला हिस्सा म्हणून देणार आहे. 1 कोटी 8 लाख रुपये महापालिका आपला हिस्सा म्हणून खर्च करणार आहे. उर्वरित 81 लाख 61 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाची निविदा काढली असली, तरी लोकसभा आचारसंहिता या आठवड्यात लागणार असल्याने त्याची वर्कऑर्डर निघण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम लोकसभा निवडणुकीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
बायोगॅसवर होणार वीजनिर्मिती
या प्रकल्पातून बायोगॅस तयार होईल. त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. ही वीज याच झूम प्रकल्पातील जनरेटरसाठी वापरण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : झूम प्रकल्पात आता २५ मेट्रिक टन कचर्‍यावर होणार प्रक्रिया Brought to You By : Bharat Live News Media.