निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च

नाशिक (पंचवटी) : Bharat Live News Media वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून पंचवटी परिसरात रूट मार्च काढण्यात आला.
विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, त्या दृष्टीने पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्चला पेठ रोडवरील फुलेनगर येथील तीन पुतळ्यांपासून सुरुवात करून पेठ रोडमार्गे पेठ फाटा, दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे रामकुंडापर्यंत काढण्यात आला.
यात पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्यासह पाच अधिकारी, २५ कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व २४ होमगार्ड, दामिनी पथक, निर्भया पथक, वाहने, सीआर व्हॅन, पिटर मोबाइल आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा:
आरोग्य : वाढता लठ्ठपणा चिंताजनक…
Lok Sabha election : शत्रुघ्न सिन्हा ते किर्ती आझाद…: जाणून घ्या ‘तृणमूल’च्या यादीतील चर्चेतील चेहरे
Rail Roko Andolan : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन: रेल्वे ट्रॅक ठप्प
Latest Marathi News निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च Brought to You By : Bharat Live News Media.
