Ranji Trophy Final : रहाणे-श्रेयस पुन्हा ‘फ्लॉप’, मुंबईच्‍या ८ गडी गमावत २०२ धावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून अनेक वादविवाद झालेल्या रणजी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात ८ … The post Ranji Trophy Final : रहाणे-श्रेयस पुन्हा ‘फ्लॉप’, मुंबईच्‍या ८ गडी गमावत २०२ धावा appeared first on पुढारी.
Ranji Trophy Final : रहाणे-श्रेयस पुन्हा ‘फ्लॉप’, मुंबईच्‍या ८ गडी गमावत २०२ धावा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून अनेक वादविवाद झालेल्या रणजी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. ४१ वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात ८ विकेट गमावून २०२ धावा केल्या आहेत. सध्या शम्स मुलाणी आणि शार्दुल ठाकूर क्रीजवर आहेत.
( Ranji Trophy Final )
रहाणे आणि श्रेयस पुन्हा फ्लॉप
मुंबईच्या डावाची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर मुंबईच्या फलंदाजांची घसरगुंडी झाली. मुशीर खान सहा, कर्णधार अजिंक्य रहाणे सात, श्रेयस अय्यर सात आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेले रहाणे आणि श्रेयस पुन्हा फ्लॉप ठरले. याआधी हे दोघेही तामिळनाडूविरुद्धच्या रणजी उपांत्य फेरीत फ्लॉप ठरले होते. (Mumbai vs Vidarbha Ranji)
यंदाच्या रणजी हंगामता बराच गदारोळ झाला आहे. काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत भाग न घेतल्याने त्यांच्या बीसीसीआय संतापली होती. यामध्ये श्रेयस आणि ईशान किशन यांची नावे प्रमुख आहेत. ईशानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून ब्रेक घेतला होता, मात्र त्याने रणजीमध्ये भाग घेतला नाही. तो हार्दिक पांड्यासोबत बडोद्यात आयपीएलच्या तयारीत व्यस्त होता. त्याचवेळी खराब फॉर्ममुळे श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांनंतर संघातून वगळण्यात आले होते.
संघातून बाहेर पडल्यानंतर श्रेयस पाठदुखीची दुखापतीमुळे रणजी खेळला नाही. मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू झाल्यानंतर एनसीएकडून श्रेयस पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला कोणतीही अडचण नसल्याचे विधान आले. दुखापतीचे निमित्त करून श्रेयस त्याच्या आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या शिबिरात पोहोचला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्याला खडसावले. यामुळे श्रेयस आणि ईशान या दोघांनाही बीसीसीआयच्या वार्षिक केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे. मात्र, श्रेयसने रणजी संघात पुनरागमन केले. तो आता मुंबईसाठी फायनल खेळत आहे.

It’s time for the Ranji Trophy Final.
It’s Mumbai Vs Vidharbha – the Maharashtrian derby. pic.twitter.com/T8QK2H18Mz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 10, 2024

हेही वाचा :

प्रासंगिक : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे मर्म
Nashik | बाईक रॅली ठरली मनसेच्या वर्धापनदिनाचे आर्कषण
जळगावची रीतू मंडोरेला सुवर्णपदक

Latest Marathi News Ranji Trophy Final : रहाणे-श्रेयस पुन्हा ‘फ्लॉप’, मुंबईच्‍या ८ गडी गमावत २०२ धावा Brought to You By : Bharat Live News Media.