प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ने केली ४२ उमेदवारांची यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित भव्‍य ‘जन गर्जन सभा’त आज (दि. १० मार्च) तृणमूल काँग्रेसच्‍या सर्वेसर्वा आणि मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राज्‍यातील लोकसभेच्‍या सर्व ४२ जागांसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्‍ये मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्‍या नावाचाही समावेश आहे. … The post प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ने केली ४२ उमेदवारांची यादी जाहीर appeared first on पुढारी.
प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ने केली ४२ उमेदवारांची यादी जाहीर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित भव्‍य ‘जन गर्जन सभा’त आज (दि. १० मार्च) तृणमूल काँग्रेसच्‍या सर्वेसर्वा आणि मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राज्‍यातील लोकसभेच्‍या सर्व ४२ जागांसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्‍ये मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्‍या नावाचाही समावेश आहे.
यावेळी ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, तृणमूल काँग्रेस राज्‍यात स्‍वबळावर निवडणूक लढवेल. तसेच आसाम आणि मेघालयात देखील लढेल. उत्तर प्रदेशातील एका लोकसभेच्या जागेवर लढण्यासाठी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीची चर्चा सुरु असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर तृणमूल काँग्रेसने २०१९ नंतर प्रथमच सभा घेतली आहे. 2019 मध्ये झालेल्या सभेत 19 विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या जागांची संख्या 34 वरून 22 पर्यंत घसरली, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) चमकदार कामगिरी करत राज्यात 18 जागा जिंकल्या. पश्‍चिम बंगालमध्‍ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आठ आमदार आणि दोन खासदार सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत.

TMC announces the names of 42 candidates for Lok Sabha elections.
Former cricketer Yusuf Pathan and party leader Mahua Moitra among the candidates. pic.twitter.com/vfmb7alfbx
— ANI (@ANI) March 10, 2024

Latest Marathi News प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ने केली ४२ उमेदवारांची यादी जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.