पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन: रेल्वे ट्रॅक ठप्प

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात शेतकऱ्यांनी आज (दि.१०) १२ ते ४ या वेळेत रेल रोको आंदोलन करण्यात आले. विशेषत: पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सर्व सज्जता ठेवली होती. Rail Roko Andolan मालगाडीच्या इंजिनवर चढण्याचा … The post पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन: रेल्वे ट्रॅक ठप्प appeared first on पुढारी.

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन: रेल्वे ट्रॅक ठप्प

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : देशभरात शेतकऱ्यांनी आज (दि.१०) १२ ते ४ या वेळेत रेल रोको आंदोलन करण्यात आले. विशेषत: पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सर्व सज्जता ठेवली होती. Rail Roko Andolan
मालगाडीच्या इंजिनवर चढण्याचा प्रयत्न
शंभू टोलनाक्याजवळील रेल्वे ट्रॅकवर मालगाडीच्या इंजिनवर शेतकऱ्यांनी चढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ रोखले. शेतकरी नेत्यांची समजूत घातल्यानंतर आंदोलक माघारी फिरले. दुसरीकडे एलनाबादमध्ये शेतकरी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. Rail Roko Andolan
Rail Roko Andolan लुधियाना स्टेशनवर गाड्या थांबल्या
अमृतसर रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांनी निदर्शने केली. देविदासपुरा येथे रेल्वे रुळ विस्कळीत झाला आहे. अबोहर आणि भटिंडा येथेही रेल्वे रुळांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे, लुधियाना रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
सिरसा येथे शेतकरी नेते नजरकैदेत
हरियाणातील सिरसा येथील शेतकरी नेते मिठू सिंग यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे माहिती दिली की, पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. मिठू कंबोज यांनी व्हिडिओ जारी करून सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाने आज 12 ते 4 या वेळेत संपूर्ण देशात गाड्या थांबवण्याचे आवाहन केले होते. सिरसामध्ये पोलीस दल, बॅरिकेडिंग, रुग्णवाहिका आणि फायर इंजिन तैनात करण्यात आले आहे.
हेही वाचा 

दिल्लीकडे कूच करण्‍यासाठी शेतकरी आंदोलक शंभू-खनौरी सीमेवर एकवटले
दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा
Kisan Andolan : तब्बल ३७८ दिवस चाललेलं शेतकरी आंदोलन अखेर मागे

Latest Marathi News पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन: रेल्वे ट्रॅक ठप्प Brought to You By : Bharat Live News Media.