‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर थिरकली साई

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी ( Sai Pallavi ) सज्ज झाली आहे. आमीर खानचा मुलहा जुनैद खानसह साई बॉलीवूड पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी साई आणि जुनैदच्या सिनेमाचे जपानमध्ये चित्रीकरण सुरू असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये दोघे विंटर लूकमध्ये बघायला मिळाले. आता साई व जुनैदच्या आगामी सिनेमाच्या जपानमधील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आता त्यांच्या एका पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये साई पल्लवी ही अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. साईच्या या व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. साई ही रणबीर कपूरसह ‘रामायण’ या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. या सिनेमात ती माता सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ( Sai Pallavi )
Latest Marathi News ‘लंडन ठुमकदा’ गाण्यावर थिरकली साई Brought to You By : Bharat Live News Media.
