आई अमृता सिंगच सारा खानची प्रेरणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय महिला दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सहकलाकारांना, मैत्रिणींना, आईला आणि बहिणीला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे अभिनेत्री सारा अली खानने ( Sara Ali Khan ) एक व्हिडीओ शेअर करत आई अमृता सिंगला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सारा ( … The post आई अमृता सिंगच सारा खानची प्रेरणा appeared first on पुढारी.

आई अमृता सिंगच सारा खानची प्रेरणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय महिला दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सहकलाकारांना, मैत्रिणींना, आईला आणि बहिणीला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे अभिनेत्री सारा अली खानने ( Sara Ali Khan ) एक व्हिडीओ शेअर करत आई अमृता सिंगला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सारा ( Sara Ali Khan ) म्हणाली की, महिला दिनानिमित्त मी माझ्या आवडत्या व्यक्तीबाबत बोलणार आहे, ती म्हणजे माझी आई. मला कुठे ना कुठे नेहमीच वाटते, मला ताकद मिळाली आहे ती आईकडून मिळाली आहे. ती माझी प्रेरणास्थान आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. नेहमी लक्षात ठेवा, एखादी स्त्री स्वतःसाठी उभी राहते तेव्हा ती सर्व स्त्रियांसाठी उभी असते. शौर्य आणि सामर्थ्य या सर्वांमध्ये असते केवळ तुम्ही स्वतःला स्वीकारायला हवे, स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असून त्यानंतर उंच भरारी घ्यायली हवी.
Latest Marathi News आई अमृता सिंगच सारा खानची प्रेरणा Brought to You By : Bharat Live News Media.