४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, बचावकार्य सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील केशोपूर मंडीजवळील दिल्ली जल बोर्ड प्लांटमध्ये तब्बल ४० फूट खोल बोअरवेलमध्ये एक मूल पडले. एनडीआरएफचे प्रभारी निरीक्षक वीर प्रताप सिंह यांच्यासह एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ज्या बोअरवेलमध्ये मुलगा पडला आहे त्याच्या समांतर एक नवीन बोअरवेल खोदून लवकरच बचाव कार्य सुरू करेल. (Delhi Borewell Accident)
Delhi Borewell Accident : बचाव कार्य सुरु
माहितीनुसार, दिल्लीतील केशोपूर मंडीजवळील दिल्ली जल बोर्ड प्लांटमध्ये एक चिमुकला खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडला. ही घटना समजताच एनडीआरएफचे प्रभारी निरीक्षक वीर प्रताप सिंह यांच्यासह एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले आहे. एनडीआरएफ बचाव पथकाचे नेतृत्व प्रभारी निरीक्षक वीर प्रताप सिंह करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सिंग म्हणाले, “ज्या ठिकाणी मूल पडले होते त्याच्या समांतर बोअरवेल खोदून आम्ही लवकरच बचाव मोहीम राबवू. तथापि, हे दीर्घकाळ चाललेले ऑपरेशन असू शकते.”
#WATCH | Delhi: A child fell into a 40-foot-deep borewell inside the Delhi Jal Board plant near Keshopur Mandi. The NDRF team has reached the site along with Inspector-in-charge Veer Pratap Singh from NDRF. It will soon start rescue operations by digging a new borewell parallel… pic.twitter.com/CbD4GAKzR3
— ANI (@ANI) March 10, 2024
हेही वाचा
ECI Commissioner Arun Goel Resigns : मोठी बातमी! आचारसंहिता लागण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा
Chandrakant Patil : राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली, आचारसंहिता ठरविण्याची गरज: चंद्रकांत पाटील
Priyanka Chopra Night Saree : प्रियांका चोप्राची ‘त्या’ रात्रीची साडी पाहण्यासाठी चाहत्यांची धडपड! ‘काळ्या ब्लाऊजमध्ये तिचे ते फोटो…’
Latest Marathi News ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, बचावकार्य सुरू Brought to You By : Bharat Live News Media.
