कोल्हापूर : दोन हजारांच्या आमिषाने हजारावर महिलांना गंडा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून करवीर तालुक्यासह जिल्हा व सीमाभागातील हजारावर महिलांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचे शनिवारी उघडकीला आले. विविध बँकांसह कंपन्यांकडून परस्पर उचललेल्या कर्जाच्या वसुलीचा तगादा वाढल्याने संतप्त महिलांनी करवीर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. सुनीता पाटील या महिलेविरुद्ध त्यांनी तक्रार अर्ज दाखल दाखल केला आहे. सामान्य महिलांना आर्थिक आमिष … The post कोल्हापूर : दोन हजारांच्या आमिषाने हजारावर महिलांना गंडा appeared first on पुढारी.

कोल्हापूर : दोन हजारांच्या आमिषाने हजारावर महिलांना गंडा

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून करवीर तालुक्यासह जिल्हा व सीमाभागातील हजारावर महिलांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचे शनिवारी उघडकीला आले. विविध बँकांसह कंपन्यांकडून परस्पर उचललेल्या कर्जाच्या वसुलीचा तगादा वाढल्याने संतप्त महिलांनी करवीर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. सुनीता पाटील या महिलेविरुद्ध त्यांनी तक्रार अर्ज दाखल दाखल केला आहे.
सामान्य महिलांना आर्थिक आमिष दाखवून फसव्या टोळीने करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा व सीमाभागात मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा संशय फसगत झालेल्या महिलांनी व्यक्त केला आहे. या उलाढालीमागे मोठे रॅकेट सक्रिय असावे, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून संशयित महिलेने कोरोना काळात एक हजारावर महिलांचे वेगवेगळे गट तयार केले. महिलांकडून
आधार कार्ड, बँकांचे पासबुक, रेशन कार्डच्या झेराक्स प्रतीसह प्रत्येकी दोन छायाचित्रेही घेण्यात आली. याशिवाय कोर्‍या कागदपत्रांवर संबंधित महिलांच्या स्वाक्षर्‍याही घेण्यात आल्या.
संबंधित कागदपत्रांच्या आधारे जिल्हा बँकेसह विविध खासगी बँका, फायनान्स कंपन्यांकडून प्रत्येक महिलेच्या नावे 50 हजारांपासून दोन-अडीच लाखांपर्यंत कर्जाची उचल करण्यात आली. सुरुवातीच्या काळात बँकांच्या कर्जाच्या हप्त्याचा नियमित भरणा करण्यात येत होता. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संशयित महिलेच्या घराजवळ गर्दी वाढू लागली होती.
वसुलीच्या तगाद्याने कुटुंबीयांचे धाबे दणाणले!
दीड-दोन वर्षापासून विविध बँका, कंपन्यांच्या कर्जांचे हप्ते थांबल्याने संस्थांच्या वसुली पथकांचा तगादा वाढू लागला आहे. संबंधित वसुली पथके थेट महिलांच्या घरांकडे येऊ लागल्याने कुटुंबीयांचे धाबे दणाणले. फसगत झालेल्या महिलांनी संशयित महिलेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने हात झटकल्याने आठवड्यापासून वाद- विवादाचे प्रकार सुरू झाले आहेत.
फसगत झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ‘करवीर’चे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला. संशयित महिलेसह तिच्या सहकार्‍यांकडून साधारणत: साडेचार ते पाच कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली असावी, असा संशय महिलांनी व्यक्त केला आहे.
करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांनी फसगत झालेल्या महिलांचा तक्रार अर्ज दाखल झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत दोषी आढळणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. फसगत झालेल्या महिलांनी कागदपत्रांसह पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : दोन हजारांच्या आमिषाने हजारावर महिलांना गंडा Brought to You By : Bharat Live News Media.