आचारसंहिता १४ किंवा १५ मार्चपासून

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या 14 किंवा 15 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचे पथक 11 ते 13 मार्च रोजी जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर जात असून, ते परतल्यानंतर निवडणूक आयोग लगेचच लोकसभा निवडणुकांची घोषणा करेल, असे बोलले जात आहे. (Lok Sabha Elections 2024) जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर … The post आचारसंहिता १४ किंवा १५ मार्चपासून appeared first on पुढारी.

आचारसंहिता १४ किंवा १५ मार्चपासून

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या 14 किंवा 15 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचे पथक 11 ते 13 मार्च रोजी जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर जात असून, ते परतल्यानंतर निवडणूक आयोग लगेचच लोकसभा निवडणुकांची घोषणा करेल, असे बोलले जात आहे. (Lok Sabha Elections 2024)
जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या हालचाली वाढल्या आहेत. याआधीही आयोगाच्या पथकाने एकदा जम्मू-काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. आता 11 ते 13 मार्च या काळात आयोगाचे पथक पुन्हा एकदा राज्यात जात असून, तेथे लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याबाबत चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात येते. (Lok Sabha Elections 2024)
पथक दिल्लीत परत आल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार 14 मार्च किंवा 15 मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा करेल, अशी शक्यता आहे. त्यानंतर लगेचच देशभर आचारसंहिता लागू होईल. (Lok Sabha Elections 2024)
Latest Marathi News आचारसंहिता १४ किंवा १५ मार्चपासून Brought to You By : Bharat Live News Media.