केशरचना सौंदर्यात भर घालत असते आणि तुम्ही नेहमीची केशरचना करुन कंटाळा आला आहे का? तर पुढील पाच केशरचना तुमच्यासाठी. (Hairstyle)
Hairstyle : स्वीट केशरचना
प्रथम केस धुवून पुढच्या बाजूने वेणी किंवा पफ करून घ्यावा. नंतर मागे पोनीटेल बांधून त्याचे छोटे-छोटे भाग करावेत आणि त्याचा एक अंबाड्यासारखा बन तयार करून घ्यावा. त्याला रोल असलेले हेअर एक्स्टेंशन बनच्या खाली लावावे. तसेच साईडला ब्रूच लावावा किंवा मध्ये एखादा बू्रच लावावा.
मनपसंत केशरचना
केस पातळ असतील तर मागे दोन उभे बन फ्रेंच रोखल्यासारखे लावावेत. जर केस खूपच पातळ असतील तर वळवताना आतमध्ये स्टफ म्हणजे कापून टाकलेले केस केसांना लावायच्या जाळीमध्ये बांधून त्याचा स्टफ तयार करावा आणि तो आपल्या केसांमध्ये घालून त्यालाच केस गुंडाळावेत आणि रोल करून लावावेत. ते रोल फिक्स करून रोल्सच्या वरती छोटे-छोटे कृत्रिम रोल करून वरती लावावेत. ती हेअरस्टाईल सजवण्यासाठी फुलाचे ब्रोचेस आकर्षक पद्धतीने लावावेत.
उलटा अंबाडा
समोरून सागर वेणीसारख्या वेण्या घालाव्यात. नंतर मागे लांब केस असतील तर त्यावर साधा अंबाडा घालावा आणि तो उलटा करून त्याचे वरचे केस अंबाड्यावर ओढून घ्यावेत.
फ्रेंच रोल
प्रथम केस विंचरून घ्यावेत. नंतर पुढचे हातांनी वळवावे. तीन वेळा वळवल्यावर आकड्याने व्यवस्थित लावावे. यात जर फॅन्सी लूक द्यायचा असेल तर मानेपासून चार इंच वर केस फिक्स करावेत आणि जर ट्रॅडिशनल लूक द्यायचा असेल तर मानेवरच फिक्स करावेत. साईडने मोत्याची वेणी लावावी.
Hairstyle : फॅन्सी रोल
सरळ सुळसुळीत केसांना स्टफ तयार करून घ्यावा. ती केसांमध्ये गुंडाळून त्याचा बन तयार करावा. त्याच्यावर बाजारात स्पार्कलच्या ट्यूब मिळतात. त्याची डिझाईन तयार करावी.
हेही वाचा
बेरोजगार राहण्याची इच्छा असणार्या जोडीदारावर पोटगीसाठी दबाव टाकू नये : दिल्ली उच्च न्यायालय
Dunki : Drop 2- Lutt Putt Gaya Song: शाहरुखचा असा अंदाज पाहिला नसेल, डंकीचे पहिले गाणे रिलीज
कोल्हापूर : पाटबंधारे प्रकल्पाअभावी धामणी खोऱ्यात पाणीटंचाई; मातीच्या बंधाऱ्यांनी पाणी अडवण्यास सुरूवात
HairStyle: ‘अशी’ करा उत्तम ‘हेअरस्टाईल’ अन् खुलवा सौंदर्य…!
Hairstyle : अश्शी हेअरस्टाईल सुरेख बाई!
Hairstyle : व्यक्तिमत्त्व खुलवणारी ‘अशी’ असावी केशरचना
झटपट आकर्षक हेअरस्टाईल कशी करायची?
‘short and sweet’ हेअर स्टाईलच्या प्रेमात या अभिनेत्री
The post स्टायलिश लूक हवाय? तर या ‘५’ केशरचना तुमच्यासाठी appeared first on पुढारी.
केशरचना सौंदर्यात भर घालत असते आणि तुम्ही नेहमीची केशरचना करुन कंटाळा आला आहे का? तर पुढील पाच केशरचना तुमच्यासाठी. (Hairstyle) Hairstyle : स्वीट केशरचना प्रथम केस धुवून पुढच्या बाजूने वेणी किंवा पफ करून घ्यावा. नंतर मागे पोनीटेल बांधून त्याचे छोटे-छोटे भाग करावेत आणि त्याचा एक अंबाड्यासारखा बन तयार करून घ्यावा. त्याला रोल असलेले हेअर एक्स्टेंशन …
The post स्टायलिश लूक हवाय? तर या ‘५’ केशरचना तुमच्यासाठी appeared first on पुढारी.