पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न; पीएमपी चालकाकडून संताप व्यक्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्युटी न मिळाल्यामुळे आज (दि. ९) एका बदली हंगामी रोजंदारीवरील पीएमपी चालकाने झाडावर चढून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस प्रशासन आणि अग्निशामन यंत्रणा वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने चालकाला रोखण्यात यश आले. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पी एम पी मध्ये बदली हंगामी म्हणून … The post पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न; पीएमपी चालकाकडून संताप व्यक्त appeared first on पुढारी.

पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न; पीएमपी चालकाकडून संताप व्यक्त

पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : ड्युटी न मिळाल्यामुळे आज (दि. ९) एका बदली हंगामी रोजंदारीवरील पीएमपी चालकाने झाडावर चढून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस प्रशासन आणि अग्निशामन यंत्रणा वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने चालकाला रोखण्यात यश आले.
पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पी एम पी मध्ये बदली हंगामी म्हणून काम करत असलेला चौरे म्हणून चालकाने काम न मिळाल्यामुळे झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला आगारातील इतर सहकाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आगारातील राजकारण आणि मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या या चालकाने थेट झाडावर चढून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी सांगून सुद्धा चालक खाली उतरत नव्हता त्यामुळे नाईलाज असतो इतर सहकाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि अग्निशामन दलाला बोलवावे लागले. तब्बल तासाभराने समजूत काढल्यानंतर चालकाला झाडावरून खाली उतरवण्यात यश आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तसेच पीएमपीच्या ताब्यात सुमारे 1500 च्या घरात बदली हंगामी रोजंदारी कामगार काम करत आहेत. रोजची ड्युटी मिळाली तरच त्यांचे घर चालणार अशी स्थिती आहे. कोरोना काळात तर या चालकांना काम न मिळाल्यामुळे त्यांचे प्रचंड हाल झाले होते, त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. आत्ताही अशी स्थिती राहिली तर या चालकांचे जगणे मुश्किल होणार आहे त्यामुळे पीएमपी प्रशासनाने आम्हाला कायम म्हणून कामावर घ्यावे, अशी मागणी बदली हंगामी रोजंदारी कामगारांकडून सातत्याने केली जात आहे.
याबाबत पुणे स्टेशन आगाराचे आगार व्यवस्थापक कुसाळकर म्हणाले, मी आत्ता बाहेरगावी आहे. या घटनेची माहिती मिळाली आहे. संबंधित चालकाला आम्ही सातत्याने ड्युटी देण्याचा प्रयत्न करतो. मात्र मनासारखी ड्युटी न मिळाल्याने त्यांच्याकडून दिलेली ड्युटी नाकारली जाते. असे प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केले जातील.
Latest Marathi News पुण्यात ड्युटी मिळाली नाही म्हणून झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न; पीएमपी चालकाकडून संताप व्यक्त Brought to You By : Bharat Live News Media.