छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यावर वाढदिवसाचे कापले २५ केक; पोलिसांचा कानाडोळा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भररस्त्यावर वाढदिवसाचा केक कापण्याची अनेक शहरांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र, एकाचवेळी २० ते २५ केक पोलिसांसमक्ष कापले जाणे, हे देखील आश्चर्यकारक आहे. दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारी रस्ता उखडून ठेवल्यानंतर रात्री त्याच रस्त्यावर टोळक्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केक कापले. हा प्रकार घडत असताना समोरुन गेलेल्या पोलिसांनी या टोळक्याला रोखण्याची साधी हिंमतही दाखवली … The post छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यावर वाढदिवसाचे कापले २५ केक; पोलिसांचा कानाडोळा appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यावर वाढदिवसाचे कापले २५ केक; पोलिसांचा कानाडोळा

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भररस्त्यावर वाढदिवसाचा केक कापण्याची अनेक शहरांमध्ये स्पर्धा लागली आहे. मात्र, एकाचवेळी २० ते २५ केक पोलिसांसमक्ष कापले जाणे, हे देखील आश्चर्यकारक आहे. दुरुस्तीसाठी शुक्रवारी दुपारी रस्ता उखडून ठेवल्यानंतर रात्री त्याच रस्त्यावर टोळक्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केक कापले. हा प्रकार घडत असताना समोरुन गेलेल्या पोलिसांनी या टोळक्याला रोखण्याची साधी हिंमतही दाखवली नाही. यावरुन पोलीस दलाचा किती धाक उरला आहे, हे लक्षात येते.
मिलकॉर्नरहून बारापुला गेटच्या दिशेने जाणारा एकपदरी रस्ता शुक्रवारी दुपारी दुरुस्तीसाठी उखडण्यात आला. या दुतर्फा रस्त्याच्या मधोमध पत्रे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याच परिसरात एलपीजीचा पंप आहे. शुक्रवारी दुपारी रस्त्याला दातरे मारण्याचे काम सुरु झाले. सायंकाळी हे काम संपुष्टात आले. त्यानंतर रात्री साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास मिलसमोरील याच रस्त्यावर टोळक्याने भलामोठा टेबल लावत त्यावर केक रचले.
रस्ता बंद असल्यामुळे एकीकडे वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. असे असताना या टोळक्याचा भररस्त्यावर धुडगूस सुरु झाला. याचवेळी छावणीकडून मिलकॉर्नरच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. पोलिसांचे वाहन पाहून हे टोळके थोडावेळ थबकले. त्यावर पोलिसांनी देखील कानाडोळा करत मिलकॉर्नर गाठले. पोलिसांची पाठ फिरताच टोळक्याने पुन्हा धुडगूस घालत रस्त्यावरच केक कापून फटाक्यांची तुफान आतषबाजी केली. विशेष म्हणजे या घटनास्थळापासून पोलीस आयुक्तालय हाकेच्या अंतरावर आहे. तसेच समोर एलपीजीचा गॅस पंपही आहे. फटाक्याच्या ठिणगीने पंपाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
घटनास्थळ क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या घटनेची नेमकी माहिती नाही. माझी आताच नियुक्ती झाली आहे. त्यामुळे घटनेची माहिती घेत आहोत.

सुनील माने, पोलीस निरीक्षक, क्रांतीचौक

हेही वाचा 

Chh. Sambhajinagar News : चिकलठाण्यात माफी मागण्यासाठी आलेल्या जावयाने केला सासऱ्याचा खून
Chh. Sambhajinagar : तिसगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूधातून विषबाधा
Chh. Sambhajinagar News: डॉक्टर पतीशी झाला वाद; प्राध्यापक पत्नीने फ्लॅटलाच लावली आग

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यावर वाढदिवसाचे कापले २५ केक; पोलिसांचा कानाडोळा Brought to You By : Bharat Live News Media.