छत्रपती संभाजीनगर: २ लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यास अटक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाचशेच्या बनावट नोटा चालनात आणणाऱ्याला एकाला शहागंज परिसरात सिटीचौक पोलिसांनी गुरूवारी (दि.7) पकडले. त्याच्याकडून तब्बल दोन लाखांच्या बनवाट नोटा जप्त करण्यात आल्या. संतोष विश्राम सिरसाठ (49, रा. राजीव नगर, जाहगीरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी … The post छत्रपती संभाजीनगर: २ लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यास अटक appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर: २ लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यास अटक

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पाचशेच्या बनावट नोटा चालनात आणणाऱ्याला एकाला शहागंज परिसरात सिटीचौक पोलिसांनी गुरूवारी (दि.7) पकडले. त्याच्याकडून तब्बल दोन लाखांच्या बनवाट नोटा जप्त करण्यात आल्या. संतोष विश्राम सिरसाठ (49, रा. राजीव नगर, जाहगीरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम हे पथकासह हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे शहागंज परिसरात सापळा रचून रस्त्याने लाल रंगाची पिशवी घेऊन जाणाऱ्या संतोष सिरसाठ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांच्या सुमारे 400 नोटा सापडल्या.
मिलकार्नर एवेजी आला शहागंजला
आरोपी बनावट नोटा घेवून पूर्वी मिलकार्नरला येणार होता. त्यानूसार पोलिसांनी सापळा देखील रचला होता. मात्र आरोपीला काही संशय आल्याने त्याने मिलकार्नर ऐवजी शहागंज परिसर निवडला. ही माहिती मिळताच पोलिसांनी शहागंज येथे सापळा रचून त्याला अटक केली.
मोेठ्या रॅकेटची शक्यता
एकाच व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात बनवाट नोटा सापडल्याने या बनावट नोटा चलणात आणणारे मोठे रॅकेट असण्यााची शक्यता व्यक्त केली असून या नोटा तो स्वत: छापत होता की कोणाकडून घेत होता याची माहिती अद्याप समोर आली नसून याचा तपास सुरू आहे. दरम्यान त्याला न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयाने 14 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा 

Chh. Sambhajinagar News : चिकलठाण्यात माफी मागण्यासाठी आलेल्या जावयाने केला सासऱ्याचा खून
Chh. Sambhajinagar : तिसगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूधातून विषबाधा
Chh. Sambhajinagar News: डॉक्टर पतीशी झाला वाद; प्राध्यापक पत्नीने फ्लॅटलाच लावली आग

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर: २ लाखांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यास अटक Brought to You By : Bharat Live News Media.