कोल्हापूर लोकसभेची जागा जिंकण्यास सज्ज रहा: सतेज पाटील

सरवडे, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, हे महत्त्वाचे नाही. तर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केले. येथील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.  Satej Patil सतेज … The post कोल्हापूर लोकसभेची जागा जिंकण्यास सज्ज रहा: सतेज पाटील appeared first on पुढारी.

कोल्हापूर लोकसभेची जागा जिंकण्यास सज्ज रहा: सतेज पाटील

सरवडे, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, हे महत्त्वाचे नाही. तर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केले. येथील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.  Satej Patil
सतेज पाटील पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील एक जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील व मी आग्रही आहोत. जिल्ह्यात भाजप विरोधी लाट असल्याने उमेदवार कोण यापेक्षा आघाडीतून दिला जाणारा उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योग्य नियोजन करावे. Satej Patil
या शिबिरात डॉ. प्रविणकुमार जांभुळे यांनी निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी मतदान नोंदणी ते मतमोजणी पर्यंत घ्यावी लागणारी काळजी तसेच मताधिक्य वाढविण्यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी स्लाईडशोच्या माध्यमातून उपस्थित बुथ प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली.
यावेळी राजू काझी, सदाशिव चरापले, सत्यजित जाधव, आर. के. मोरे, सुशीलकुमार पाटील, शामराव देसाई, हिंदुराव चौगले आदींची भाषणे झाली.
यावेळी निरीक्षक मधुकर रामाणे, संजयसिंह पाटील, हर्षवर्धन मोरे, जीवन पाटील, जे. के. पाटील, डी. एस. पाटील, जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे, मेघा धनवडे, धनश्री हातकर, मोहन धुंदरे, जयवंतराव पाडळकर, विलास पाटील, संजय कांबळे, शिवाजी आदमापुरे आदींसह बथ प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. रणधीर मोरे यांनी स्वागत तर जीवन पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा 

कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी
कोल्हापूर : ‘सीपीआर’मध्ये एमआरआयच्या आशा पल्लवित
कोल्हापूर : भुदरगडमध्ये ३५ गावांत अंगणवाडी मदतनीस भरती

Latest Marathi News कोल्हापूर लोकसभेची जागा जिंकण्यास सज्ज रहा: सतेज पाटील Brought to You By : Bharat Live News Media.