बीड: परळी-गंगाखेड मार्गावर ट्रक खड्ड्यात कोसळला; चालक, क्लिनर जखमी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव वसाहतजवळ ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळला. या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले. ही घटना आज (दि.९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ट्रक चालक दयानंद आत्माराम पुयनर (वय 34, रा. पांगरी ता. गंगाखेड), महादेव गंगाधर कोटंबे (वय 29 रा. राणीसावरगाव ता. गंगाखेड) हे दोघे जण जखमी … The post बीड: परळी-गंगाखेड मार्गावर ट्रक खड्ड्यात कोसळला; चालक, क्लिनर जखमी appeared first on पुढारी.

बीड: परळी-गंगाखेड मार्गावर ट्रक खड्ड्यात कोसळला; चालक, क्लिनर जखमी

परळी वैजनाथ, Bharat Live News Media वृत्तसेवा : गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव वसाहतजवळ ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळला. या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले. ही घटना आज (दि.९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
ट्रक चालक दयानंद आत्माराम पुयनर (वय 34, रा. पांगरी ता. गंगाखेड), महादेव गंगाधर कोटंबे (वय 29 रा. राणीसावरगाव ता. गंगाखेड) हे दोघे जण जखमी झाले. त्यांच्यावर परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परळी – गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी ते वडगाव वसाहत यादरम्यान पुलाचे व रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. गंगाखेडकडून येणारा ट्रक (एम एच 12 एन एक्स 8367) भरधाव येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला. चालता ट्रक रस्त्याच्या कडेला जात खड्ड्यात जावून कोसळला. या आपघातात चालक व अन्य एकजण ट्रकच्या कॅबिनमध्येच अडकून पडले होते. हा थरारक अपघात झाला. त्यावेळी वाहनचालकांनी व रस्त्याच्या कामावरील लोकांनी मदतकार्य करुन अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.
हेही वाचा 

बीड : आष्टीत माजी आमदार यांच्या कार्यक्रमात मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ
बीड: हर-हर महादेवाच्या जयघोषात गेवराईतील शिवमंदिरे गजबजली
बीड : गेवराईत भगर पिठातून विषबाधा, अनेकांची प्रकृती बिघडली, धनंजय मुंडेंकडून रूग्‍णांची विचारपूस

Latest Marathi News बीड: परळी-गंगाखेड मार्गावर ट्रक खड्ड्यात कोसळला; चालक, क्लिनर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.