सांगली : हिंगणगादेत डोक्यात काठी घालून गळ्यातील सोन्याची साखळी पळवली

विटा: Bharat Live News Media वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे किराणा दुकानदाराच्या डोक्यात काठी घालून गळ्यातील सोनसाखळी पळवली. ही घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याबाबत दुकानदार सुभाष बापूराव मोहिते यांनी विटा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, सुभाष मोहिते यांचे हिंगणगादे येथे किराणा दुकान आहे. ते त्यांचे मोटारसायकलवरुन पिराजी लोखंडे यांच्या विहिरीजवळून जात असताना त्यांच्या डोक्यात काठीसारख्या वस्तूने घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने तोडून घेवून चोरुन नेली. याप्रकरणी विटा पोलिसांत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
सांगली : राब-राब राबून मिळवलं जगण्याचं बळ; मंडईत, बाजारात महिलाराज
महिला कैद्यांना मिळणार शिलाईचे प्रशिक्षण; सांगलीत कारागृह प्रशासनाचा उपक्रम
टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी द्या : सांगलीच्या आमदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Latest Marathi News सांगली : हिंगणगादेत डोक्यात काठी घालून गळ्यातील सोन्याची साखळी पळवली Brought to You By : Bharat Live News Media.
