कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी

बांबवडे पुढारी वॄत्तसेवा : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथे गुंगा चंद्राप्पा शेळके यांच्या मालकीच्या शेडमधून ९ बकऱ्यांची चोरी झाली.  हा प्रकार आज (दि.९) दुपारी २ ते ३ या वेळेत झाला असून चोरीच्या ठिकाणी एक चाकू सापडला आहे. या बाबत माहिती अशी की गुंगा शेळके यांच्या मालकीचे वारणा कापशी मलकापूर रोड वर जनावरांचे शेड आहे. त्यामध्ये … The post कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी appeared first on पुढारी.

कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी

बांबवडे Bharat Live News Media वॄत्तसेवा : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथे गुंगा चंद्राप्पा शेळके यांच्या मालकीच्या शेडमधून ९ बकऱ्यांची चोरी झाली.  हा प्रकार आज (दि.९) दुपारी २ ते ३ या वेळेत झाला असून चोरीच्या ठिकाणी एक चाकू सापडला आहे.
या बाबत माहिती अशी की गुंगा शेळके यांच्या मालकीचे वारणा कापशी मलकापूर रोड वर जनावरांचे शेड आहे. त्यामध्ये त्यांनी गाई- म्हैशी बरोबर बकऱ्यांही पाळल्या आहेत, आज दुपारी दिड वाजता शेळके हे जनावर व बकऱ्यांना चारा पाणी देऊन घरी आले. दरम्यान ३.३० च्या सुमारास गुंगा शेळके यांचा मुलगा शेड मध्ये गेला असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. आज या रोडवरील डोंगरावर असणाऱ्या महादेव मंदीरात महाप्रसाद होता. त्यामुळे लोकांची तसेच वाहनांची ये-जा होती. त्यातून दिवसा चोरीचा प्रकार झाला आहे. बकऱ्यांच्या दोऱ्या कापून वाहणातून मोठी ९ बकरी लंपास केली आहेत, सदर घटनेची शाहूवाडी पोलीसात नोंद झाली आहे.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; जालन्यातून बाबूराव काळे विजयी, परभणीत अण्णासाहेब गव्हाणे पराभूत
Nagpur News : ब्रेकिंग! भाजपच्या किचन किट वाटपात चेंगराचेंगरी; एका महिलेचा मृत्यू     

Latest Marathi News कोल्हापूर : वारणा कापशी येथे दिवसा ९ बकऱ्यांची चोरी Brought to You By : Bharat Live News Media.