ब्रेकिंग! भाजपच्या किचन किट वाटपात चेंगराचेंगरी: एका महिलेचा मृत्यू

नागपूर Bharat Live News Media वृत्तसेवा : नुकताच जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा झाला. आज (दि.९) नागपुरातील सुरेश भट सभागृहात भाजपच्या घरेलू कामगार कुटुंबातील महिलांना किचन किट वाटप कार्यक्रमात दुर्दैवी घटना घडली. सकाळपासून रांगेत असलेल्या महिलेचा दार उघडताच झालेल्या धावपळीत मृत्यू झाला. इतरही काही महिला जखमी झाल्या असून आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. श्रीमती मनू तुळशीराम राजपूत (वय 65) (रा. आशीर्वाद नगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. (Nagpur News) आयोजक, व्यवस्थापक यांच्या नियोजनशून्यपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीतर्फे मनीषा पापडकर यांनी केला.
Nagpur News : जखमी महिलांचा आकडा वाढण्याची भीती
माहितीनुसार, सुरेश भट सभागृह येथे भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातर्फे बांधकाम कामगार व घरेलू कामगारांची नोंदणी व कीट वाटप शिबिर ८ मार्च ते १० मार्च दरम्यान राबवण्यात आले. अनेक महिला सकाळी ५ वाजता पासून रांगेत उभ्या होत्या. आज (दि.९) सकाळी ७ वाजतापासून मोठ्या प्रमाणात महिला सुरेश भट सभागृह येथे जमल्या होत्या. सकाळी गेट न उघडता १०.३० वाजता गेट उघडताच महिला एकमेकांच्या अंगावर पडल्या व झालेल्या चेगराचेंगरीमध्ये एक महिला मृत पावली. आशीर्वाद नगर येथील मनू तुळशीराम राजपूत (वय ६५) ही महिला गंभीर असल्याने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर म्हणाल्या, ” यात आमच्या काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत. या संपूर्ण घटनेची जबाबदारी कंत्राटदारांची होती. दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येत महिला या ठिकाणी येत आहेत. व्यवस्थापक आणि ठेकेदार यांनी समय सुचकता दाखवून संबंधित भाजप पदाधिकारी यांना लगेच कळवायला हवे होते. परंतु ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अत्यंत दुर्देवी घटना घडली. सुरेश भट सभागृह येथील व्यवस्थापक आणि कंत्राटदार यांच्यावर कलम ३०२ नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा जेणेकरून भविष्यात अशा चुका होणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने घरेलू कामगार महामंडळ, भाजपच्या समनव्यातून माजी नगरसेवक बाल्या बोरकर, भास्कर पराते आदी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; जालन्यातून बाबूराव काळे विजयी, परभणीत अण्णासाहेब गव्हाणे पराभूत
Chandrakant Patil : राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली, आचारसंहिता ठरविण्याची गरज: चंद्रकांत पाटील
Latest Marathi News ब्रेकिंग! भाजपच्या किचन किट वाटपात चेंगराचेंगरी: एका महिलेचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
