राज्याच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली : चंद्रकांत पाटील

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: राजकारणात कोणी कोणाला काहीही बोलत आहे. कोणी कोणाला बेडूक म्हणतो, तर कोणी साप म्हणतो. सगळे प्राणी एकदम राजकारणात आणून टाकले जात आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली आहे. एकदा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविली पाहिजे, असे मत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. Chandrakant Patil वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी … The post राज्याच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली : चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

राज्याच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली : चंद्रकांत पाटील

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: राजकारणात कोणी कोणाला काहीही बोलत आहे. कोणी कोणाला बेडूक म्हणतो, तर कोणी साप म्हणतो. सगळे प्राणी एकदम राजकारणात आणून टाकले जात आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली आहे. एकदा सगळ्या पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविली पाहिजे, असे मत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. Chandrakant Patil

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात त्यांना प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ते आज (दि.९) प्रतिक्रिया देत होते. Chandrakant Patil

दरम्यान, अमरावती लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी सोडविणारे नक्की सोडवितील, असे स्पष्ट केले. या देशातील लोकशाही जगातील सर्वात प्रस्थापित झालेली लोकशाही आहे. अशा लोकशाहीमध्ये लोकसभेकरिता त्या- त्या पक्षाला उमेदवार ठरवायला, कोणाला कुठली जागा द्यायची, चिन्ह कुठले द्यायचे, हे ठरवायला वेळ लागतो. त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहित आहे. योग्य दिशेने गाडी चालली आहे. त्या- त्या पक्षांच्या नेत्यांना कधी मूठ उघडायची, हे चांगले माहित आहे. त्यामुळे ते मूठ उघडतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

अमरावती : अस्थि विसर्जन करून परत येणाऱ्या पिकअप वाहनाचा शेंदुर्जना घाट पुलावर अपघात, १४ जण गंभीर
अमरावती : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सैनिकाचा मृत्यू, एक गंभीर
राजकारण इच्छेवर चालत नाही, अमरावती लोकसभेचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Latest Marathi News राज्याच्या राजकारणात सगळ्यांची भाषा बदलली : चंद्रकांत पाटील Brought to You By : Bharat Live News Media.