अकोला: अकोट-हिवरखेड रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोट – हिवरखेड रस्त्यावरील खंडाळा  फाट्यानजीक विघ्नहर्ता लॉनजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ८)  रात्री ८ च्या दरम्यान घडली. याबाबत अधिक  माहिती अशी की,  भास्कर राऊत (रा. पणजहे)  हे त्यांच्या पत्नी सविता राऊत यांच्यासह हिवरखेडवरून … The post अकोला: अकोट-हिवरखेड रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी appeared first on पुढारी.

अकोला: अकोट-हिवरखेड रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी

अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोट – हिवरखेड रस्त्यावरील खंडाळा  फाट्यानजीक विघ्नहर्ता लॉनजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ८)  रात्री ८ च्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक  माहिती अशी की,  भास्कर राऊत (रा. पणजहे)  हे त्यांच्या पत्नी सविता राऊत यांच्यासह हिवरखेडवरून अकोटकडे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पाठीमागून त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात सविता राऊत या जागीच ठार झाल्या. तर भास्कर राऊत गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळी  पोलिस कर्मचारी यांनी  दाखल होत जखमीला  पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रक उलटला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी  ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा 

अकोला: राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली
अकोला : चिमुकल्याचे दुसऱ्यांदा अपहरण करण्याचा प्रयत्न: संशयितावर गुन्हा दाखल
PM Suryoday Yojana 2024 : पंतप्रधान सूर्योदय योजनेत अकोलासह ७ जिल्ह्यांची निवड

Latest Marathi News अकोला: अकोट-हिवरखेड रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.