आता Zomato महिला डिलीव्हरी पार्टनर्स नव्या लूकमध्ये! कंपनीने लॉन्च केला कुर्ता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जोमॅटो (Zomato) च्या महिला डिलीवरी पार्टनर आता नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. कंपनीने त्यांच्यासाठी एक नवा कुर्ता (kurta) लॉन्च केला आहे. (Zomato)
Women’s Day ला शुक्रवारी ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी जोमॅटोने आपल्या महिला डिलीव्हरी पार्टनर्ससाठी नवा कुर्ता लॉन्च केला आहे. कंपनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. कंपनीने सांगितले की, अनेक महिला डिलीव्हरी पार्टनरने “वेस्टर्न स्टाईलच्या जोमॅटो टी-शर्टसोबत अस्वस्थता व्यक्त केली होती.
कंपनीने महिला दिनी विभिन्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, ‘आजपासून जोमॅटो महिला डिलीव्हरी पार्टनर कुर्ता परिधान करणे निवडू शकतातत.’ कंपनीच्या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे. तर काही लोकांचे लक्ष फक्त कुर्तामधील शिलाई केलेल्या खिशावर राहिली. तर काहींनी म्हटले की, काही अन्य लोकांनी घोषणा करताना वेळेवर प्रश्न उपस्थित केले आणि यास ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे म्हटले.
View this post on Instagram
A post shared by Zomato (@zomato)
The post आता Zomato महिला डिलीव्हरी पार्टनर्स नव्या लूकमध्ये! कंपनीने लॉन्च केला कुर्ता appeared first on Bharat Live News Media.
