परळी : राज्‍य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जीवन संपवले

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा राज्य गुप्तचर विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने परळी वैजनाथ येथे रेल्वे रुळावर जीवन संपवल्याची घटना समोर आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीड एसआयडीला सुभाष दुधाळ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची पुणे येथे बदली झालेली आहे. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून, यातून … The post परळी : राज्‍य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जीवन संपवले appeared first on पुढारी.

परळी : राज्‍य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जीवन संपवले

परळी वैजनाथ, Bharat Live News Media वृत्तसेवा राज्य गुप्तचर विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने परळी वैजनाथ येथे रेल्वे रुळावर जीवन संपवल्याची घटना समोर आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीड एसआयडीला सुभाष दुधाळ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची पुणे येथे बदली झालेली आहे. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून, यातून त्‍यांच्या जीवन संपवण्यामागचे कारण समोर येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे एसआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज (शनिवार) सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूला खालील रेल्वेरुळावर आढळून आला. शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वे गाडीखाली येऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची माहिती कळविली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उड्डाणपूला जवळील रेल्वे पटरीवर एकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असे असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे एसआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा हा मृतदेह आहे.
दरम्यान ही घटना जीवन संपवल्‍याची आहे की, संशयास्पद मृत्यू याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चिठ्ठीच्या अनुषंगानेच या मृत्यू मागचे कारण समोर येणार आहे. दरम्‍यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : 

राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

‘पैसा ही पैसा बाबू भैया’ : क्रिप्टोकरन्सी मालामाल; बिटकॉईनला रेकॉर्डब्रेक किंमत | Bitcoin

मध्‍य प्रदेशमध्‍ये काँग्रेसला धक्‍का, माजी केंद्रीय मंत्री पचौरींसह १२ जणांचा भाजपमध्‍ये प्रवेश

Latest Marathi News परळी : राज्‍य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने जीवन संपवले Brought to You By : Bharat Live News Media.