दिल्लीत महायुतीच्या जागांवर शिक्कामोर्तब; असं असेल जागावाटप

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीमधील बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. भाजपला ३४, शिंदेंच्या शिवसेनेला १० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा दिल्या जातील. महायुतीमध्ये अजूनही १-२ जागांवर तिढा कायम आहे. त्यावर स्थानिक पातळीवर चर्चा करून हे प्रश्न सोडवावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले असल्याचे वृत्त ‘पुढारी न्युजने’ दिले आहे. … The post दिल्लीत महायुतीच्या जागांवर शिक्कामोर्तब; असं असेल जागावाटप appeared first on पुढारी.

दिल्लीत महायुतीच्या जागांवर शिक्कामोर्तब; असं असेल जागावाटप

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीमधील बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. भाजपला ३४, शिंदेंच्या शिवसेनेला १० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा दिल्या जातील. महायुतीमध्ये अजूनही १-२ जागांवर तिढा कायम आहे. त्यावर स्थानिक पातळीवर चर्चा करून हे प्रश्न सोडवावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले असल्याचे वृत्त ‘Bharat Live News Media न्युजने’ दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत भाजपकडून जो नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, त्यानुसार शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणखी जागा वाढवून मिळाल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावावर शिंदे शिवसेनेचीच कोंडी होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना १३ खासदारांनी साथ दिली. आपले बोलणे झाले आहे. त्यामुळे आपली उमेदवारी पक्की असल्याची खात्री या १३ खासदारांना होती.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या बारामती, शिरूर, रायगड, परभणी या जागा जिंकण्याचं अजित पवार यांचं लक्ष्य असणार आहे.
हेही वाचा : 

वंचित मविआमध्ये राहणार का? संजय राऊत म्हणाले,…
मायावतींची मोठी घोषणा : लोकसभा निवडणूक स्‍वबळावर लढविणार
PM मोदींकडूनअरुणाचल प्रदेशला १८ हजार कोटींची भेट

Latest Marathi News दिल्लीत महायुतीच्या जागांवर शिक्कामोर्तब; असं असेल जागावाटप Brought to You By : Bharat Live News Media.