मोठी बातमी : मध्य प्रदेश मंत्रालयातील वल्लभ भवन इमारतीला भीषण आग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या इमारतीला (वल्लभ भवन) आज ( दि. ९ मार्च ) सकाळी आग लागली. वल्लभ भवनच्या काही मजल्यांवर आग लागली, ही वेगाने पसरत आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
मंत्रालयातील वल्लभ भवनच्या गेट क्रमांक ५ आणि ६ समोरील जुन्या इमारतीत ही आग लागली. तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली आहे. दरम्यान वल्लभ भवन इमारतीमध्ये सरकारी कामाशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे येथे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती मिळत आहे. भीषण आगीची माहिती मिळताच भोपाळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निसुरक्षा तज्ज्ञ पंकज खरे घटनास्थळी धाव घेतली आहे.
#WATCH | Madhya Pradesh | A massive fire breaks out at Vallabh Bhavan State Secretariat in Bhopal. Firefighting operations are underway. Details awaited. pic.twitter.com/QBto0QSVIy
— ANI (@ANI) March 9, 2024
सफाई कामगारांनी दिली आगीची माहिती
मंत्रालयातील वल्लभ भवन इमारतीच्या ५ आणि ६ क्रमांकाच्या गेटसमोर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीत धूर निघताना दिसला. त्यानंतर मंत्रालयाचे सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी सुट्टी असल्याने एकही कर्मचारी मंत्रालयात उपस्थित नव्हता. तत्पूर्वी वल्लभ भवनाजवळील सातपुडा भवनच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यात आरोग्य विभागाच्या अनेक महत्त्वाच्या फायली व कागदपत्रे जळाली असल्याचे वृत्त देखील स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
Latest Marathi News मोठी बातमी : मध्य प्रदेश मंत्रालयातील वल्लभ भवन इमारतीला भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.
