
कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खरेदीसोबत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी देणाऱ्या दै. ‘Bharat Live News Media’ व टोमॅटो एफएम आयोजित ‘शॉपिंग उत्सव २०२३’च्या लकी ड्रॉमधील बक्षिसांचे वितरण सोमवार (दि. ११) पासून करण्यात येणार आहे. या ड्रॉमधील बक्षीस विजेत्यांनी आपली बक्षिसे दैनिक ‘Bharat Live News Media’ कार्यालयातून १२ ते ५ या वेळेत घेऊन जावीत, असे आवाहन Bharat Live News Media व्यवस्थापनाने केले आहे. बक्षीस घेण्यासाठी येताना बक्षीसधारकांनी बक्षिसाचे कुपन सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच त्यांची प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘Bharat Live News Media शॉपिंग उत्सव २०२३’ आयोजित करण्यात आला होता. या शॉपिंग उत्सवात सहभागी दुकानांतून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉचे कुपन देण्यात आले होते. जमा झालेले कुपन एकत्र करून शहरात दोन आणि ग्रामीण भागात एक असे तीन साप्ताहिक लकी ड्रॉ व एक बंपर ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉमधील विजेत्या ग्राहकांमधून इलेक्ट्रिक वाईक, सोने, ब्लेंडर, हेडफोन व सरप्राईज गिफ्ट अशी बक्षिसे मिळाली आहेत. या ग्राहकांनी बक्षिसासाठी दिलेल्या वेळेत दैनिक ‘Bharat Live News Media’ कार्यालयात येऊन बक्षिसे घेऊन जावीत, असेही Bharat Live News Media व्यवस्थापनाच्या वतीने कळविले आहे.
Latest Marathi News ‘Bharat Live News Media शॉपिंग उत्सव २०२३’ चे बक्षीस वितरण सोमवारपासून Brought to You By : Bharat Live News Media.
