तावडे हॉटेल समोर प्रेमसंबंधाच्या कारणावरून खुरप्याने वार

गांधीनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : उचगाव येथील हद्दीत तावडे हॉटेल समोर, रिक्षा स्टॉप जवळ प्रेमसंबंधाच्या कारणावरून एकावर खुरप्याने वार करून गंभीर जखमी केले. सलमान मैनुदीन शेख, (वय-३५ वर्षे, धंदा-फिरस्ता, मूळ रा. शाहू कॉलेज समोर, विचारे मळा, सदरबाजार, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष सुरेश कोळी, वय २६ वर्षे, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, वीटभट्टीजवळ, कागल, जि. कोल्हापूर मूळ रा. रामनगर, चिकोडी, ता. चिकोडी) यास गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी सलमान मैनुद्दीन शेख, त्याची प्रेयसी संगीता कोळी तसेच तिची मावशी शांता असे तावडे हॉटेल समोर, रिक्षा स्टॉप जवळ बोलत थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी संतोष सुरेश कोळी हा तेथे अचानक आला. आपली नातेवाईक संगीता हिला तू शेखसोबत का बोलतेस असे विचारू लागला, त्यावर संगीता हिने तो माझा प्रियकर असून मी त्याच्या बरोबर बोलणार असे सांगितले. त्या दोघांना सुरेशने शिवीगाळ करून त्याच्या जवळील खुरपे (विळा) याने शेख याच्या डोक्यात, दोन्ही हातावर, उजवे पायाचे पंजावर पाठीत वार करून गंभीर जखमी केले. यावेळी सलमान शेख तेथून जखमी अवस्थेत भीतीपोटी पळून जाऊन पंचगंगा नदीचे ब्रीज खाली रात्रभर थांबला. सकाळी त्यास कोणीतरी पाहिले व त्याबाबत पोलिसांना कळविले. रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले.
Latest Marathi News तावडे हॉटेल समोर प्रेमसंबंधाच्या कारणावरून खुरप्याने वार Brought to You By : Bharat Live News Media.
